एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा सुपरस्टार
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खानच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम रविवारी मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सलमान खानने इंडस्ट्रीतील त्याच्या अनेक सेलिब्रिटी फ्रेंड्सना आमंत्रित केले होते. रितेश-जेनेलिया देशमुख, कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, डेविड धवन, अनुष्का शर्मा, शब्बीर अहलुवालिया, डब्बू रत्नानी, एली अवराम, स्नेहा उलाल यांच्यासह अनेक सेलेब्स या कार्यक्रमाला पोहोचले होते.
मात्र या सर्व पाहुण्यांमध्ये या कार्यक्रमाचा होस्ट अर्थातच सलमान खान एका खास पाहुण्याकडे स्पेशल अटेंशन देताना दिसला. ही खास पाहुणी होती सलमानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानी. यावेळी सलमान सतत संगीतासोबतच दिसला. इतकेच नाही तर सलमानने तिला किस करुन तिचे खास स्वागत केले. ब्रेकअपच्या एवढ्या वर्षानंतरसुद्धा संगीता आणि सलमानची मैत्री कायम आहे हे विशेष. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने संगीताला घरी पोहोचवण्यासाठी कारचीसुद्धा व्यवस्था केली होती. तो तिला सोडण्यासाठी कारपर्यंतसुद्धा आला होता. या दोघांच्या स्पेशल बाँडिंगची खास झलक छायाचित्रांमध्ये तुम्हीही पाहा...