आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\'पूर्वी आम्ही होतो, \'बाहुबली\'नंतरसुद्धा आम्हीच असू... हे काय बोलून गेला सलमान!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानने अलीकडेच त्याच्या आगामी 'ट्युबलाईट' या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणारेय. 'बाहुबली 2'च्या रेकॉडब्रेक कमाईनंतर आता सगळ्यांच्या नजरा सलमानच्या सिनेमाकडे लागल्या आहेत. 

याविषयी सलमानला विचारले गेले असता, त्याने अतिशय आत्मविश्वासाने उत्तर दिले. तो म्हणाला, ''बाहुबली (2015) नंतर आम्ही बजरंगी भाईजान घेऊन आलो होतो. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगले परफॉर्म केले. आता आम्ही ट्युबलाईट घेऊन आलो आहोत.''  

'बाहुबली'च्या कोट्यवधींच्या कमाईविषयी सलमान गंमतीशीररित्या म्हणाला, "ते चार वर्षांत एक सिनेमा बनवता, मी वर्षाला दोन रिलीज करतो, तर अॅव्हरेज तेवढीच कमाई होऊन जाते." पुढे सलमान म्हणाला, 'बाहुबली 2' मी अद्याप पाहिलेला नाही. पण हा एक अद्भूत सिनेमा आहे. इतकेच नाही प्रत्येक सिनेमा हा त्याचे नशीब घेऊन येत असतो, असेही वक्तव्य सलमानने यावेळी केले.  

पुढील स्लाईड्सवर बघा, ट्युबलाईट या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये क्लिक झालेले सलमानचे वेगवेगळे मुड्स आणि तिस-या स्लाईडवर व्हिडिओत बघा, सलमान काय म्हणाला... 
बातम्या आणखी आहेत...