आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याचा 'भाऊ' बनण्यास सलमानने दिला होता नकार, हे आहे संपूर्ण प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. सुमारे दोन वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झाले. पण या चित्रपटाच्या रिलीजच्या दोन वर्षांपूर्वी सलमानला ऐश्वर्याच्या भावाचा रोल ऑफर झाला होता, हे तुम्हाला माहिती आहे का, सलमान मात्र यासाठी तयार नव्हता.

हा होता चित्रपट..
- एक रिपोर्ट्सनुसार 1997 मध्ये सलमान खानला डायरेक्टर मन्सूर खानच्या 'जोश' (2000) चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले होते. पण त्याने ऐश्वर्याचा भाऊ बनायचे नसल्याचे सांगत हा चित्रपट नाकारला होता. नंतर ही भूमिका शाहरूख खानला मिळाली.
सलमानला बदलायचा होता 'हम दिल दे चुके सनम' चा क्लायमॅक्स
- 'हम दिल दे चुके सनम' च्या क्लायमॅक्समध्ये ऐश्वर्या अजय देवगणकडे परतते. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, सलमानने हा क्लायमॅक्स बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. 
- सलमानची अशी इच्छा होती की, ऐश्वयाने शेवटी तिचे प्रेम असलेल्या सलमानकडे परतावे, पण भन्साळी त्यासाठी तयार नव्हते.

सलमानला का बदलायचा होता क्लायमॅक्स..
- रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या शुटिंगच्या काळात सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा झालेला होता. त्यामुळे ऐश्वर्यासाठी इतर कोणालाही निवडले जाऊ नये असे त्याला वाटत होते. अगदी चित्रपटातही तो त्यासाठी तयार नव्हता. 
- भन्साळींनी ऐकले नाही तेव्हा सलमान त्याचा खास मित्र सूरज बडजात्या यांच्याकडे मदत मागायला गेले. पण त्याला त्याचा हा हट्ट पूर्ण करता आला नाही.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सलमानने जेव्हा दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी..
बातम्या आणखी आहेत...