आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 35 कुणी 45 वर, सलमानसह हे 6 स्टार्स \'नवरदेव\' होण्याचा प्रतिक्षेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिट अॅंड रन प्रकरणी सलमान खानला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. सलमान प्रोफेशन लाईफमध्ये जेवढा चर्चेत राहतो तेवढीच चर्चा त्याच्या पर्सनल लाईफचीही होते. 49 वर्षीय हा स्टार अजूनही सिंगल आहे. आतापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. यातील अनेक रिलेशन लग्नापर्यंत जाईल असे वाटले होते. पण सलमान एकटाच राहिला. लग्नाबद्दल विचारले असता सलमान प्रश्न टाळतो. पण एका रियालिटी शोमध्ये सलमान खानने संकेत दिले होते, की 2015 मध्ये तो लग्न करणार आहे.
संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ, लुलिया वंतूर यांच्यासह अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खानचे नाव जोडण्यात आले. पण त्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही. यातील बहुतांश रिलेशन केवळ वाद झाला किंवा निराशा झाली यामुळे संपुष्टात आले.
या तीन रिलेशनमध्ये सलमान होता सिरिअस
संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत सलमान अफेअर राहिले आहे. त्यांचे लग्न होईल असे त्यावेळी वाटत होते. पण अखेर कडू झाला. काही महिन्यांपूर्वी सलमानचे नाव रोमानियाची अभिनेत्री लुलियासोबत जोडले गेले होते. सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नातही लुलिया दिसली होती.
सलमानसारखे आणखी काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी लग्न केलेले नाही... जाणून घेऊयात अशा सेलेब्जबद्दल....पुढील स्लाईडवर क्लिक करा...