आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Saved The Relationship Of Arbaaz And Malaika

सलमानने वहिणीला केली विनंती, \'अरबाजसोबतचे नाते तोडू नकोस\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: मागील महिन्यात अरबाज खान आणि मलाइका अरोरा खान विभक्त होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी अरबाज मलाइकाच्या आईच्या बर्थडे पार्टीत एकत्र दिसला होता. अरबाजने या पार्टीत उपस्थिती दर्शवून वेगळ्या झाल्याच्या बातम्यांना काहीप्रमाणात पूर्णविराम लावला आहे.
मात्र नुकतेच एक वृत्त समोर आले, की दोघांचे नाते टिकवण्यासाठी अरबाजचा भाऊ सलमान खान महत्वाची भूमिका निभावतोय. सलमानने वहिणी मलाइकाला फोन केला आणि या विषयावर बराच वेळ बोलला, असे सांगितले जात आहे.
काय म्हणाला सलमान...?
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानने मलाइकाला समजावून सांगितले, की 18 वर्षे जूने नाते संपुष्टात आणणे योग्य नाहीये.
- त्याने मलाइकाला विनंती केली, की तिने हे नाते तोडू नये. वाचवण्याचा प्रयत्न करावा.
या नात्याविषयी मीडियात काय म्हटले गेले...?
- मलाइकाने 18 वर्षे जूने नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
- मलाइकाने खान फॅमिलीला सोडून दिले आणि आईच्या घरी शिफ्ट झाली आहे.
- मात्र, dainikbhaskar.comने या अपार्टमेंटच्या गार्डसोबत बातचीत केली, तेव्हा संकेत मिळाले, की दोघांमध्ये सर्वकाही ठिक आहे.
- त्याने असेही सांगितेल, की मलाइका नेहमी येथे येत असते. कधी ती लवकर घरी जाते किंवा येथेच थांबते.
- काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता, की मलाइका बहीण अमृताच्या घरी शिफ्ट झाली आहे.
- परंतु येथील गार्डनेसुध्दा असेच सांगितले, की मलाइका कधी एकटी तर कधी अरबाजसोबत येथे येते.
- त्यांना पाहून वाटत नाही, की दोघांमध्ये वाद असेल.
बॉलिवूड इनसाइडर काय म्हणाले?
- एक बॉलवूड इनसाइडरने सांगितले, 'प्रत्येक कुटुंबात मतभेद निर्माण होतात. अरबाज-मलाइकाविषयी बोलायचे झाले तर दोघांमध्ये काही वाद होते, जे आता सुटले आहेत.'
- मलाइका माहेरच्या मंडळीविषयी खूप पझेसिव्ह आहे. त्यामुळे तिने वांद्र्यात घर शिफ्ट केले.
- जर मलाइका आई आणि बहिणीसोबत जास्त वेळ घालवताना दिसते तर यात आश्चर्यासारखे काहीच नाही.
तीन वर्षांपूर्वी आला होता दूरावा...
- एका सूत्राने सांगितले, 'दोघांमध्ये तीन वर्षांपूर्वीसुध्दा त्यांचात दूरावा निर्माण झाला होता. त्यांना हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता.'
- दोघांनी सामंजस्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. परंतु 6 महिन्यांनंतर झालेल्या पेरेंटिंग काऊंसलिंगदरम्यान दोघांनी वाद विसरून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
- दोघांचे नाते वाचण्यासाठी अरबाजचा भाऊ सलमान खानने महत्वची भूमिका साकारली होती.

दोघे करत होते शो होस्ट...
- मलायका आणि अरबाज यांची 17 वर्षांपासूनची बाऊंडींग पाहून पॉवर कपल शो निर्मात्यांनी त्यांना शो होस्टची ऑफर दिली होती.
- मलायका आणि अरबाज कित्येक दिवसांपासून पॉवर कपल शो होस्ट करत होते.
- मात्र काही दिवसांपासून मलायका या शो मध्ये दिसत नाही. अरबाज एकटाच शो होस्ट करताना दिसत होता.
- सेटवरील सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबरच्या सुरुवातीला दोन्ही कलाकारांनी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रुमची मागणी केली होती. ते सेटवरही फार बोलताना दिसत नव्हते.
- ब्रेकनंतर दोघेही आपापल्या रुममध्ये जाऊन बसत होते, ते एकत्र फार कमी दिसत होते.
- दरम्यान, अशी माहिती आहे की चॅनलच्या विनंतीवरुन दोघे शोच्या फायनलमध्ये एकत्र दिसणार आहेत. त्याचे शुटिंग गोव्यातील एका व्हिलामध्ये लवकरच होणार आहे.
केव्हा झाले होते लग्न...
- अरबाज आणि मलायका यांचे लग्न 1998 च्या डिसेंबरमध्ये झाले होते.
- लग्नाआधी दोघे जवळपास पाच वर्षे डेटिंग करत होते.
- मलायका अरबाज पेक्षा सहा वर्षे लहान आहे.
अरबाजचे करियर...
- 4 ऑगस्ट 1967 ला जन्मलेल्या अरबाजने अभिनेता म्हणून करियरची सुरुवात 1996 मध्ये 'दरार' चित्रपटातून केली. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट व्हिलन अवॉर्ड मिळाला होता.
- 'प्यार किया तो डरना क्या', 'गर्व', 'कयामत', 'हलचल', 'मालामाल वीकली', 'भागम भाग', 'फॅशन', 'दबंग', 'दबंग-2' सारख्या चित्रपटातून अरबाज झळकला आहे.
- अरबाज आता अॅक्टिंगपेक्षा डायरेक्शनवर फोकस करत आहे. त्याच्या दिग्दर्शनात तयार झालेला पहिला चित्रपट आहे 'दबंग- 2'.
मलायकाचे करियर...
- मलायकाने मॉडेल म्हणून करियरची सुरुवात केली.
- 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल से' चित्रपटातील 'छैया.. छैया' गाण्यातून झळकलेली मलायका सर्वांच्या लक्षात राहिली.
- तिने अनेक चित्रपटात आयटम नंबर्स केले आणि कॅमियो रोल्स देखिल.
- टीव्हीवरील अनेक डान्स रियालिटी शोमध्येही जज म्हणून मलायका दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मलाइका, अरबाज आणि सलमानचे फोटो...