आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: अबू धाबीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे सलमान खान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक अली अब्बास जफरचा आगामी चित्रपट 'टाइगर जिंदा है'च्या शूटिंगसाठी सलमान खान सध्या अबुधाबीमध्ये आहे. येथे शूटिंगदरम्यानचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळी सलमान त्याच्या कोस्टार्ससोबत दिसत आहे. तो अबुधाबीच्या रोडवर घोडेस्वारी करत आहे. तर एका फोटोमध्ये फायटींग सीननंतर रिलॅक्स करताना दिसत आहे. फोटोंवरुन असे कळून येते की, अबुधाबीमध्येही सलमानच्या फॅन्सची कमी नाही. शूटिंगदरम्यान सलमान त्याच्या फॅन्सच्या गराड्यात दिसत आहे. 
 
सलमानच्या चित्रपटाच्या शूटिंगचे लास्ट शेड्यूल सुरु आहे. याअगोदर चित्रपटाचे शूटिंग मोरोक्कोमध्ये सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरअगोदर या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होणार आहे. चित्रपटात सलमानसोबत कतरीना कैफ आहे. यशराज फिल्मसच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट आदित्य चोप्राने प्रोड्युस केला आहे. यावर्षी ख्रिसमसवेळी हा चित्रपट रिलीज होईल. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, टायगर जिंदा है चित्रपटाच्या शूटिंगचे ऑन लोकेशन फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...