आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Should Have To Marry This Year Says Numerologist

न्यूमेरोलॉजिस्ट म्हणाले- 2016मध्ये लग्न केले नाही तर कधीच बोहल्यावर चढू शकणार नाही सलमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सलमान खान - Divya Marathi
फाइल फोटो : सलमान खान
मुंबई- सेलिब्रिटी न्यूमरॉलजिस्ट संजय जुमानी यांच्या सांगण्यानुसार, सलमान खान 50 वर्षांचा झाला आहे. अर्थातच त्याचे अंक 6 (5+1) आहे. याचप्रकारे 2016चा अंक 9(2+0+1+6) आहे. हे दोन्ही लकी अंक असतात. संकेत मिळताच सलमानने यावर्षी लग्न करावे. जर त्याने 2016मध्ये असे केले नाही तर त्याचे कधीच लग्न होणार नाही. असे त्याने dainikbhaskar.comला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.
काही खास गोष्टी ज्या सलमानच्या लग्नाच्या देतात संकेत-
- 'हिट अँड रन' प्रकरणात हायकोर्टच्या निर्णयानंतर सलमानच्या जवळचा मित्र आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी सांगितले होते, 'सलमान वयाच्या 34व्या वर्षीच लग्न करणार होता. परंतु कोर्टात चालू असलेल्या प्रकरणामुळे त्याने असे केले नाही.'
- एका इंग्रजी वर्तमानपत्राला सलमानच्या परिचित व्यक्तीने सांगितले, 'जेव्हा कधी सलमानचे पालक त्याला लग्नासाठी विचारतात, तेव्हा त्याचे एकच उत्तर असते, 'जर कोर्टाचा निर्णय माझ्या विरोधात आला तर मी पत्नीला काय उत्तर देऊ?' ती आमच्या मुलांना काय उत्तर देईल? ती आमच्या मुलांना असे सांगेल, की तुमचे वडील तुरुंगात आहेत.' या सूत्राच्या सांगण्यानुसार, लग्नासाठी सलमानला या प्रकरणातून बाहेर पडायचे होते. या सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'आता कोर्टाचा निर्णय सलमानच्या बाजूने लागला आहे, तर त्याच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे.'
- सलमानलासुध्दा कोर्टात चालू असलेल्या निर्णयाची प्रतिक्षा होती. अलीकडेच एका मुलाखतीत सलमानने सांगितले होते, 'मी लग्नाविषयी तेव्हाच विचार करू शकले जेव्हा कोर्टाचा निर्णय येईल.' सलमानला विचारण्यात आले होते, की कोर्टाचा निकाल त्याच्याविरोधात आला तर? यावर सलमान म्हणाला होता, 'तेव्हा मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतरच लग्न करेल.'
लुलिया बनू शकते सलमानची नवरी?
- रोमानिअन मॉडेल लुलिया वेंचूरसोबत सलमानचे नाव दिर्घकाळापासून जोडले जात आहे.
- सलमानच्या 50व्या बर्थडेवेळी बातमी आली होती, की तो लुलियाला गर्लफ्रेंड म्हणून सर्वांना भेटवणार आहे. मात्र नंतर याबाबत काहीच अपडेट आले नाही.
न्यू ईअर इव्हवर लुलिया सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत लुलिया पनवेल स्थित फार्महाऊसमध्ये उपस्थित होती.
- काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि लुलिया वेंचूर एकत्र आऊटिंग करताना दिसले होते.
- ऑक्टोबर 2015मध्ये सलमान खान आणि लुलिया यांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. नंतर सलमानची बहीण अर्पिताने याचे खंडन केले होते.
- शिवाय, लुलिया, खान कुटुंबीयांसोबत जवळपास सर्वच इव्हेंटमध्ये दिसले. अर्पिताच्या लग्नादरम्यान ती खान कुटुंबासोबत हैदराबादमध्ये स्पॉट झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानसोबत लुलियाचे क्लिक झालेले फोटो...