आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Sister Shweta Rohira Shocking Transformation After Losing Almost 20 Kilos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या बहिणीने कमी केले 20 किलो वजन, Fat To Fit झाल्यानंतर आता असा आहे लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण आणि अभिनेत्री श्वेता रोहिरा सध्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. अलीकडेच श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोजमध्ये तिचा मेकओव्हर बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वेता स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतेय. याकाळात तिने तब्बल 20 किलो वजन कमी केले असून स्लिम झाल्यानंतर ती अतिशय स्टनिंग दिसतेय. 


सलमानकडून मिळाली वजन कमी करण्यासाठी प्रेरणा... 
- श्वेताने अलीकडेच एका लीडिंग वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की ती गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनकडे लक्ष देतेय.
- 20 किलो वजन कमी करण्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी श्वेताने डाएट प्लान फॉलो केला. शिवाय योगा आणि तासन्तास जिममध्ये घाम गाळला. 
- श्वेताने सांगितले, की वजन कमी करण्याची प्रेरणा तिला तिचा मानलेला भाऊ सलमान खानकडून मिळाली.
- श्वेताने सांगितले, "सलमान आणि माझा सख्खा भाऊ सिद्धार्थ माझ्यासाठी प्रेरणास्थानी आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतरच मी वजन कमी करण्याचे मनावर घेतले. आता मी बरेच वजन कमी केले आहे, पण भविष्यात मला माझा हा फिटनेस कायम ठेवायचा आहे." 
- "वेट लॉस झाल्यानंतर मला अनेक टीव्ही शोज आणि चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. पण सध्या मी माझे लक्ष रायटिंग आणि पेंटिंगवर केंद्रित केले आहे." 
- "पुलकित सम्राटची एक्स वाइफ अशी ओळख मला नकोय. मला माझे स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे. श्वेता रोहिरा या नावाने लोकांनी मला ओळखावे, अशी माझी इच्छा आहे."


नव-यापासून विभक्त झाली आहे श्वेता...
- श्वेताचे लग्न अभिनेता पुलकित सम्राटसोबत झाले होते. पण आता हे दोघे विभक्त झाले आहेच.
- दोघांनी याचवर्षी जानेवारी महिन्यात वांद्र्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
- श्वेता आणि पुलकित यांचे 2014 साली गोव्यात लग्न झाले होते. या लग्नात श्वेताच्या फॅमिली मेंबर्ससोबत सलमान खानची विशेष उपस्थिती होती.
- लग्नाच्या काही दिवसांतच पुलकित आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या. त्यानंतर पुलकित आणि श्वेता यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. वाद एवढा विकोपाला गेला,  2017 मध्ये हे कपल विभक्त झाले.
- जेव्हा पुलकित एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या शोमध्ये काम करत होता. त्याकाळात श्वेता एक ट्रेनी जर्नलिस्ट होती. त्याकाळात  दोघांची भेट झाली होती. या भेटीचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले होते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, श्वेता रोहिराचे ट्रान्सफॉर्मेशननंतरचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...