आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा सिद्दीकी यांच्या पार्टीनंतर सलमानने 'GF'सोबत केले लेट नाइट डिनर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि लुलिया वेंचूर - Divya Marathi
सलमान खान आणि लुलिया वेंचूर
मुंबई: सलमान खान रविवारी (19 जून) रात्री काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत गेला होता. परंतु तो येथे जास्त वेळ थांबला नाही. याचे कारण लुलिया होती. त्याला लुलियासोबत डिनर डेटवर जायचे होते. सूत्रांच्या सांगण्यानुसार, रात्री उशीरा दोघे वांद्र्यातील 'द कॉर्नर हाऊस' रेस्तरॉबाहेर दिसले. त्यावेळी सलमानच्या दोन्ही बहिणी आणि भावोजीसुध्दा उपस्थित होते. सलमान आणि लुलिया एकाच कारमध्ये घरी गेल्याचे सांगितले जाते.
इफ्तार पार्टीत खान कुटुंबीतील अनेक सदस्य...
बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत खान कुटुंबातील अनेक सदस्य पोहोचले होते. त्यात सलमानचे वडील सलीम खान, सावत्र आई हेलन, बहीण अलविरा खान, धाकटी बहीण अर्पिता खान, भावोजी अतुल अग्निहोत्री, धाकटा भावोजी आयुष शर्मा आणि अडीच महिन्याचा भाचा आहिल सामील होते. परंतु त्याची कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूरया पार्टीत दिसली नाही. परंतु सलमानची एक्स-गर्लफ्रेंड कतरिना कैफ या पार्टीत पोहोचली होती. ती 'सुल्तान'चा दिग्दर्शक अली अब्बास जफरशी बोलताना दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इफ्तार पार्टीत पोहोचलेल्या सलमान, त्याची फॅमिली आणि एक्स-गर्लफ्रेंडचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...