आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Buzz: 'गर्लफ्रेंड'ची हिंदी सुधारण्यासाठी प्रयत्न करतो सलमान, अपॉइंट केला ट्युटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः रोमानियन अॅक्ट्रेस आणि टीव्ही अँकर लूलिया वंतूरला हिंदी बोलता येत नाही. बॉलिवू़डमध्ये पदार्पण करण्यासाठी तिच्यासमोर हीच एक मोठी अडचण ठरली आहे. शिवाय सलमानच्या कुटुंबीयांशीसुद्धा तिला बोलता येत नाही. त्यामुळेच आता सलमानने एक पाऊल पुढे टाकत आपल्या गर्लफ्रेंडसाठी हिंदी ट्युटरची नेमणूक केली आहे. जेणेकरुन लुलियाला हिंदीचे धडे गिरवता येतील.
लुलियानेही घेतले आहे मनावर...
अद्याप लुलिया आणि सलमानच्या कुटुंबीयांमध्ये नीट बातचित झालेली नाही. सोबतच भाषेच्या अडचणीमुळे हिंदी सिनेमांमध्येही तिला काम मिळत नाहीये. जेव्हा लुलिया सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली होती, तेव्हा तिथे उपस्थितांसोबत ती हिंदीत बोलू शकली नव्हती. मात्र आता ट्युटरच्या मदतीने हिंदी शिकण्याचे तिने मनावर गेतले आहे. एकंदरीतच लुलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी अॅक्टिव झाली आहे.
रिअॅलिटी शोमध्ये एकत्र...
सलमान आणि लुलिया लवकरच एका रिअॅलिटी शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. या शोमध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटी स्पर्धक शेती करताना दिसतील. सलमानने केवळ या शोचे हक्कच विकत घेतले नाहीत, तर तो शोचा को-होस्टसुद्धा असेल. सलमानने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर करुन लिहिले होते, ''दीर्घ काळापासून हा शो करु इच्छित होतो. हा बिग बॉससारखाच असेल मात्र शेतात.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लुलिया वंतूरची लेटेस्ट छायाचित्रे...