आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2016मध्ये सलमान खानचे मानधन होणार 100 कोटी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांपासून सलमान खान बॉक्स ऑफिसवर विक्रम रचत आहे. आता नवीन वर्षात १०० कोटी रुपये मानधन घेणारा तो एकमेव अभिनेता ठरू शकतो. या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या यशराज फिल्म्सच्या कुस्तीवर आधारित चित्रपटासाठी त्याने नफ्यामध्ये समान हिस्सा घेण्याचा सौदा केला आहे.
सलमानचा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. यामध्ये सुलतान नावाच्या फायटरची भूमिका साकारणारा सलमान नफ्यामध्ये भागीदार बनणार आहे. सूत्राने सांगितले की, ‘चित्रपटाचा निर्मिती खर्च वसूल केल्यानंतर एकूण कमाईची समान वाटणी यशराज स्टुडिओ आणि सलमानमध्ये होईल. या सौद्याच्या बदल्यात यशराज बॅनरने सलमानकडून फक्त ८० दिवस घेतले आहेत. आतापर्यंत मोठ्या अभिनेत्यांना नफ्यातील सौद्यांमध्ये २० ते ३५ टक्के भागीदारी मिळत होती. स्वत: सलमाननेही आपल्या चित्रपटांमध्ये मानधनाऐवजी टीव्ही प्रसारण आणि संगीत अधिकार घेतले आहेत.’
‘रेडी’ (२०११) मध्ये त्याचे मानधन १७.५ कोटी होते. ‘एक था टायगर’ (२०१२) २७.५ कोटी, ‘दबंग-२’ (२०१२) ६० कोटी, ‘जय हो’ आणि ‘किक’ (२०१४) ४८ कोटी रुपयांचे सॅटेलाइट अधिकार आणि १२ कोटींचे संगीत अधिकार सलमानने घेतले होते. ‘प्रेम रतन धन पायो’चे बजेट जास्त असल्याने सलमानने फक्त सॅटेलाइट अधिकार (४८ कोटी) घेतले. त्याच्या आगामी चित्रपटाचा निर्मिती खर्च ७५ कोटी आणि प्रिंट प्रचार खर्च २५ कोटी रुपये आहे. म्हणजेच एकूण १०० कोटी. यामध्ये त्याच्या मानधनाचा समावेश नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बॉलिवूडमधील खान्सविषयी इनसाइड गॉसिप्स...
बातम्या आणखी आहेत...