आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fans Go Berserk To See Salman Khan Walking On Road

कार सोडून चक्क चालत निघाला सलमान, एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची झुंबड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खान नेहमीच आपल्या चाहत्यांमध्ये मिसळताना दिसतो. मग मुंबईतील बॅण्डस्टॅण्ड परिसरात नियमितपणे सायकल चालवणे असो वा अलीकडेच ऑटोने प्रवास करणे असो, सलमान कोणत्याही परिस्थितीत आपल्या चाहत्यांमध्ये येत असतो.
आता हेच बघा ना, गुरुवारी सलमान आपली कार सोडून सेलिब्रिटी असल्याचा आव न आणता अगदी सामान्यांप्रमाणे रस्त्याने पायी चालत यशराज स्टुडिओत पोहोचला. सलमान रस्त्याने पायी चालताना बघून त्याची एक झलक बघण्यासाठी त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा जमला. भाईजान सलमानची एक झलक आपल्या कॅमे-यात कैद करण्यासाठी त्याचे चाहते त्याच्या शेजारी जमले होते. सलमाननेसुद्धा अगदी हसतमुखाने आपल्या चाहत्यांना त्याची छायाचित्रे काढू दिली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, यावेळी क्लिक झालेली सलमानची छायाचित्रे...