आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदच्या नमाजनंतर फॅमिली फ्रेंडच्या अंत्यसंस्कारात पोहोचला होता सलमान खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन. एम. कुंजालकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी सलमान खान - Divya Marathi
एन. एम. कुंजालकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी सलमान खान
मुंबईः सुपरस्टार सलमान खानचे जवळचे मित्र एन. एम. कुंजालकर यांचे शनिवारी निधन झाले. ते व्यवसायाने वकील होते. शनिवारी चेंबुर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारात करण्यात येते. ईदच्या नमाजनंतर सलमान त्याचे वडील सलीम खान यांच्यासोबत आपल्या या फॅमिली फ्रेंडला अखेरचा निरोप द्यायला पोहोचला होता.
सलमान आणि सलीम खान यांच्यासह अलविरा खान, तिचे पती अतुल अग्निहोत्री, अभिनेता सुनील शेट्टी, सनी दिवान हे देखील येथे पोहोचले होते. असे म्हटले जाते, की कुंजालकर यांचा मुलगा सलमानचा राइट हँड असून तो नेहमी त्याच्यासोबत दिसतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एन. एम. कुंजालकर यांच्या अंत्यसंस्कारातील सलमानची छायाचित्रे...