आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला शिक्षा झाली तेव्हा रात्रभर रडत होती ऐश्वर्या, आहे डायहार्ट फॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमानचे फॅन्स देश-विदेशात पसरले आहेत. काश्मिरमध्येही त्याची डायहार्ट फिमेल फॅन आहे. ऐश्वर्या चौबेला चित्रकलेची आवडत आहे. पण सलमानला भेटण्यासाठी ती चित्रपटांमध्ये प्रवेश करीत आहे. सोनाक्षी सिन्हा स्टारर अपकमिंग फिल्म अकीरामध्ये ती दिसणार आहे.
या ऐश्वर्याने सलमानच्या अनेक पेंटिंग्ज काढल्या आहेत. सलमानला भेटण्यासाठी ती एक पेंटिंग घेऊन बजरंगी भाईजानच्या सेटवर गेली होती. सलमानला भेटणे हे तिचे एक स्वप्न होते. तिला हे पेंटिंग सलमानला गिफ्ट करायचे होते. पण यावेळी सलमानची आणि तिची भेट काही होऊ शकली नाही. त्यामुळे तिने हे पेंटिंग सलमानची मैत्रिण सोनाक्षी सिन्हाला दिले. तिला वाटले होते, की या निमित्ताने सोनाक्षी तिची भेट सलमानसोबत करुन देईल.
सलमानसोबत भेट होण्यापूर्वीच तो मुंबईला परतला. सेशन कोर्टात त्याची सुनावणी होणार होती. त्यामुळे तिची सलमानसोबत भेट काही झालीच नाही. पण मुंबईत आल्यानंतर या ऐश्वर्याला अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची सुवर्णसंधी मिळाली. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, की सलमानची भेट घ्यायची असल्याने मी अभिनयाच्या क्षेत्रात आली आहे. मला अभिनयाची जराही आवड नाही, हे सत्य आहे.
सलमानला शिक्षा झाली त्या दिवशी ही ऐश्वर्या रात्रभर रडत होती, असेही सांगितले जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सलमानची डायहार्ट फॅन ऐश्वर्याचे काही फोटो....