आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजरंगी भाईजान'च्या सेटवर गार्ड्सची चाहत्यांना मारहाण, लागले 'सलमान हाय हाय'चे नारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहलगाममध्ये शूटिंगवेळी सलमान खान)
पहलगाम (जम्मू-काश्मिर) : सुपरस्टार सलमान खान सध्या पहलगाममध्ये आहे. येथे तो आपल्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचे शूटिंग करतोय. येथे सलमानला चाहते आणि पर्यटकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानचे चाहते त्याच्यावर रागावले आहे. सलमानची एक झलक बघण्यासाठी काही लोक शूटिंग सेटवर पोहोचले होते. मात्र सलमानच्या सिक्युरिटी गार्ड्सनी त्यांनी मारहाण करुन तेथून पळवून लावले. त्यानंतर चाहत्यांनी सलमानविरोधात 'सलमान हाय हाय'चे नारे लावायला सुरुवात केली. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सलमानने विन्रमता दाखवली आणि लांबून चाहत्यांना हात दाखवला.
तर दुसरीकडे येथे आलेले पर्यटकसुद्धा खूप निराश झाले आहेत. कारण पहलगाम येथे शूटिंग सुरु असल्याने काही ठिकाणी पर्यटकांना रोखण्यात येत आहे. खरं तर या ठिकाणी वर्षभर देभरातील पर्यटक पहलगामचे सौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी येत असतात. मात्र सध्या तेथे सलमानच्या सिनेमाचे शूटिंग सुरु असल्याने सिक्युरिटी गार्ड्स तैनात ठेवण्यात आले आहेत.
सिनेमाच्या शूटिंगची काश्मिरमधील काही छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये सलमान ब्लॅक कुर्ता आणि ब्लू जीन्समध्ये दिसतोय. त्याने गळ्यात मफलर बांधला आहेत. 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहेत. तर सलमान खान आणि रॉकलाइन वेंकटेश निर्माते आहेत. सलमानसह या सिनेमात करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावर्षी 17 जुलै रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शूटिंगदरम्यानची सलमानची छायाचित्रे...