आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हम दिल दे...\'च्या सेटवर असा असायचा सल्लूचा अंदाज,बघा 90\'sमध्ये क्लिक झालेले RARE PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'हम दिल दे चुके सनम\' या गाजलेल्या सिनेमाच्या शूटिंग सेटवर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत सलमान खान - Divya Marathi
\'हम दिल दे चुके सनम\' या गाजलेल्या सिनेमाच्या शूटिंग सेटवर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत सलमान खान
मुंबई: बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यातील नाजूकपणाबद्धल केवळ बॉलिवूडच नव्हे तर, त्यांच्या चाहत्यावर्गातही चांगलीच कल्पना आहे. मात्र, काही कारणांमूळे टोकाचा दुरावा निर्माण झाल्यावर ते दोघेही एकमेकांसमोर येणे टाळतात. असे असले तरी सलमानच्या हृदयात मात्र, अद्यापही जून्या अठवणी कायम असाव्यात, अशी शंका अनेकदा येते. आता हेच बघा ना ‘सुल्तान’च्या निमित्ताने या आठवणी आणि चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. ‘सुल्तान’ हा सलमानचा आगामी सिनेमा असून यानिमित्ताने सलमानने काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो बुडापोस्टमधील शेचेन्यी ब्रिजवरचा होता. याच ब्रिजवर ऐश्वर्याच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाच्या एका सीनचे शुटींग झाले होते. ज्यात ऐश्वर्या धावत जाऊन अजय देवगणच्या खांद्यात विसावते. सलमाननेही याच ब्रिजवरचा एक फोटो पोस्ट केला केला जो चर्चेचा विषय ठरला.

नव्वदच्या दशकात रिलीज झालेला 'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा खूप गाजला होता. याच सिनेमाच्या सेटवरील सलमानची काही छायाचित्रे समोर आली आहेत. वरील छायाचित्रात सलमान शॉर्ट पँट आणि विदाऊट शर्टमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत उभा दिसतोय.

सलमानची 90 च्या दशकातील अशीच आणखी काही अनसीन छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी या पॅकेजमधून घेऊन आलो आहोत. ही छायाचित्रे सलमानच्या चाहत्यांसाठी नक्कीच ट्रीट ठरेल. कारण या छायाचित्रांधील सलमानचा अंदाज कदाचित तुम्हाला यापूर्वी बघायला मिळाला असावा...
बातम्या आणखी आहेत...