आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या \'आखाड्यां\'त शूट झाला सलमानचा \'सुल्तान\', असे तयार केले सेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरती (डावीकडे) नॅशनल स्टेट चॅम्पियनशिप आखाडा, उजवीकडे प्रो-टेक डाऊन, खाली बरकत हवेली आखाडा - Divya Marathi
वरती (डावीकडे) नॅशनल स्टेट चॅम्पियनशिप आखाडा, उजवीकडे प्रो-टेक डाऊन, खाली बरकत हवेली आखाडा
मुंबई: दिग्दर्शक अली अब्बास जफरचा 'सुल्तान' या आगामी सिनेमात सलमान खान हरियाणाच्या पहिलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात सुल्तान केवळ पत्नी अरफाचे मन जिंकण्यासाठी रेसलर बनतो. सिनेमात रेसलिंगच्या वेगवेगळ्या लेव्हल दाखवण्यात आल्या आहेत. त्यासाठी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अनेक आखाडे रिक्रिएट करावे लागले होते. 'सुल्तान'चा प्रॉडक्शन डिझाइनर रजनीश हेडाऊने याची माहिती divyamarathi.comसोबत शेअर केली.
बरकत हवेली आखाडा
- हा आखाडा बरकत हवेलीचा एक भाग आहे. हा सिनेमात अरफाचे घर आहे. अनुष्ता (अरफा) याच ठिकाणी सुल्तानला रेसलिंगचे प्रशिक्षण देते. रजनीश हेडाऊने सांगितले, की टीमने फिल्मसिटीमध्ये जवळपास 3 एकर परिसरात बरकत हवेली आखाड्याचा सेट तयार केला.
नॅशनल स्टेट चॅम्पियनशिप आखाडा...
बरकत हवेली आखाड्यात ट्रेनिंग घेतल्यानंतर 'सुल्तान' नॅशनल स्टेट चॅम्पियनशिप आखाड्यात दिसतो. हा आखाडासुद्धा मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये तयार करण्यात आला.
प्रो-टेक डाऊन (वर्ल्ड रेसलिंग)
नॅशनल स्टेट चॅम्पियनशिप आखाड्यात ट्रेनिंग घेतल्यानंतर सुल्तान इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतो. हा रेसलिंगवर आधारित फॉरेन रिअॅलिटी टीव्ही शो 'प्रो-टेक डाऊन' आहे. हा एक इंटरनॅशनल शो असल्याने आम्हाला त्याच्या शूटिंगसाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये सेट लावावा लागला. येथे 12 दिवस सिनेमाचे शूटिंग चालले.
शूटिंगसाठी मुंबईत बनवले होते हरियाणाचे एक गाव...
सलमानसोबत सिनेमाचे संपूर्ण शूटिंग हरियाणाच्या रिअल लोकेशन्सवर करणे निर्मात्यांसाठी कठिण होते. त्यासाठी हरियाणाच्या 'बरेली' गाव मुंबईतच रिक्रिएट करावे लागले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'सुल्तान'चे ज्या आखाड्यात शूटिंग झाले ते PHOTOS
बातम्या आणखी आहेत...