आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही छायाचित्रे सांगतात \'Helpfull\' व्यक्ती आहे सलमान, पाहा त्याचे काही क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 2002मध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल सत्र न्यायालयाने बुधवारी (5 मे) सुनावला आहे. या प्रकरणात सलमानला तब्बल पाच वर्षांचा कारावास सुनावण्यात आला आहे. परंतु त्वरील हायकोर्टात अर्ज दाखल करून दोन दिवसांचा अंतरिम जामीन सलमानने मिळवला आहे. मात्र आज (8 मे) त्याच्या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
सलमानच्या हातून गुन्हा तर घडलाच आहे, मात्र तो खासगी आयुष्यात गरजू व्यक्तींना मदत करणारासुध्दा आहे. सलमानची अशी अनेक छायाचित्रे आहेत जी याची ज्वलंत उदाहरणे आहेत. सलमान स्वत:ची एक चॅरिटेबल ट्रस्ट बीइंग ह्यूमनसुध्दा चालवतो. या संस्थे अंतर्गत तो गरजू आणि गरीबांना मदत करतो. सलमान बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मदत करणारी व्यक्ती मानली जाते. तो नवोदित कलाकारांना काम करण्याची संधी प्रप्त करू देतो. तसेच तो इंडस्ट्री बाहेरील लोकांना सढळ हाताने मदत करत असतो. आजारी लोकांना, लहान मुलांना, तसेच इतर गरजू लोकांना सलमान नेहमी मदत करताना दिसतो.
सलमान लोकांना किती मदत करतो, हे आम्ही तुम्हाला काही छायाचित्रांतून दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमाची अशीच छायाचित्रे...