Home »Gossip» Salman, Sonam And Other Bollywood Celebs And Their Serious Illnesses

सलमान खानपासून सोनम कपूरपर्यंत, या 8 सेलिब्रिटींनी दिलाय गंभीर आजाराला लढा

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 11:32 AM IST

मुंबई: अभिनेता सलमान खान सध्या ऑस्ट्रियामध्ये असून येथे तो त्याच्या आगामी 'टाइगर जिंदा है' या सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिनेमासाठी सलमानने त्याचे 17 किलो वजन कमी केल्याचे म्हटले जात आहे. तसं पाहता सलमानचा लेटेस्ट लूक बघता त्याने वजन कमी केल्याचे दिसून येत आहे. आता सलमान एखाद्या सिनेमासाठी सहजरित्या वजन कमी करतो आणि ते वाढवतोसुद्धा. पण एक काळ असा होता, जेव्हा सलमान गंभीर आजाराशी लढा देत होता.

ट्राईजेमिनल न्यूराल्जियाने त्रस्त होता सलमान खान...
सलमान खान ट्राईजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) नावाच्या आजाराने पीडित होता. यासाठी त्याने दीर्घकाळ उपचार घेतले. या उपचारासाठी तो नेहमी अमेरिकेला जात असतो. हा एक न्यूरोपॅथिक डिसऑर्डर आहे. या आजारात रुग्णाच्या चेह-यावरील काही भागांत (डोक आणि जबडा) खूप दुखतं. सलमान सात ते आठ वर्षे या आजाराने पीडित होता.

सोनम कपूर
बॉलिवूडमध्ये फॅशन आयकॉन नावाने ओळखल्या जाणा-या अभिनेत्री सोनम कपूरला कमी वयातच मधुमेह झाला होता. दररोज इन्सुलिनचा डोज घेऊन खास डाएट केल्यानंतर तिने या आजारावर मात केली. कधीकाळी सोनम खूप लठ्ठ होती. मात्र, आता सोनमने या आजारातून मुक्तता केली आहे. तिने लठ्ठपणातूनसुध्दा स्वत:ची सुटका करून घेतली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून गंभीर आजाराला लढा देणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी...

Next Article

Recommended