आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 किलो वजन कमी करून Fat ची Fit बनली ही अॅक्ट्रेस, नुकताच झाला विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस'ची एक्स कंटेस्टंट आणि आयटम गर्ल संभावना सेठ हिने ती फॅटची फिट बनली असल्याचे म्हटले आहे. सुमारे अडिच महिन्यांपूर्वी संभावनाचा विवाह झाला होता. तेव्हापासून तिचे वर्कआऊट करायला सुरुवात केली होती. आतापर्यंत तिने 11 किलो वजन कमी केले असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओही शेअर केला आहे. पूर्ण वर्ष मी जाड असल्याचे टोमणे ऐकले. पण जेवढे टोमणे ऐकले तेवढी अधिक प्रेरणा घेतली, आणि वजन घटवले. नुकतेच संभावनाने फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
सुमारे अडिच महिन्यांपूर्वी 14 जुलैला संभावनाने ब्वॉयफ्रेंड अविनाश द्विवेदीबरोबर विवाह केला होता. मुंबईत झालेल्या या सोहळ्यात निवडक पाहुण्यांचीही उपस्थिती होती. संभावना आणि अविनाश गेल्या पाच वर्षांपासून डेट करत होते.

'बिग बॉस 2', 'हल्लाबोल' ची कंटेस्टंट
संभावना सेठने 'बिग बॉस'च्या दुसऱ्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर 'बिग बॉस 8'च्या 'हल्लाबोल'मध्येही ती चॅलेंजर म्हणून घरात आली होती. 'डांसिंग क्वीन' शोची ती विनर होती तर 'दिल जीतेगी देसी गर्ल' आणि 'वेलकम: बाजी मेहमान नवाजी की' मध्येही ती झळकली होती. 'वेलकम बॅक' मध्ये तिचे आयटम नंबरही होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संभावनाचे काही लेटेस्ट आणि जुने PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...