एन्टरटेन्मेंट डेस्कः 1991साली आलेल्या 'सनम बेवफा' या सिनेमातील लीड अॅक्ट्रेस चांदनी तुम्हाला आठवतेय का... दीर्घ काळापासून चांदनी बॉलिवूडमधून गायब आहे. सलमान खानसोबत डेब्यू करणा-या चांदनीने निवडक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. पण येथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात ती अपयशी ठरली.
आता कुठे आणि काय करते चांदनी जाणून घेऊयात...
यूएसमध्ये सेटल झाली चांदनी...
चांदनी हे तिचे खरे नाव नसून नवोदिता शर्मा हे खरे नाव आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने खरे नाव सोडून स्वतःचे चांदनी हे नाव ठेवले. आता चांदनी यूएसमध्ये स्थायिक झाली असून येथील ऑरलॉडो शहरात डान्स क्लास चालवते. इंडस्ट्रीत अपयशी ठरुन देखील तिला बॉलिवूडविषयी एवढा जिव्हाळा आहे, की तिने तिच्या दोन्ही मुलींची नावे करिश्मा आणि करीना ही ठेवली आहेत.
पुढे वाचा, कसा आहे चांदनीचा प्रवास...