आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानमुळे लांबणीवर पडली संजयची बायोपिक, आता 2018 मध्ये होणार रिलीज!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: राजकुमार हिराणी दिग्दर्शित संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमाचे शूटिंग येत्या 14 जानेवारीपासून सुरु होत आहे. 30 जूनपर्यंत सिनेमाचे शूटिंग पूर्ण होणारेय. त्यानंचर एडिटिंग आणि लहान लहान री शूटिंगचे मार्जिन ठेएऊन सिनेमाच्या फाइनल कटची तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. निर्मात्यांनी परफेक्शनिस्ट राजू हिराणींच्या कामाची पद्धत बघता यामध्ये 15 दिवस एक्स्ट्रा जोडले होते. 

सलमानमुळे आता ख्रिसमसला रिलीज होणार नाही सिनेमा...  
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र आता अडचण ठरतेय ती त्याची रिलीज डेट. हिराणींचे मागील तीन सिनेमे (मुन्ना भाई, थ्री इडियट्स आणि पीके) डिसेंबर महिन्यात रिलीज झाले होते. फक्त 'लगे रहो मुन्ना भाई' हा सिनेमा सप्टेंबरमध्ये आळा होता. मात्र यावर्षी त्यांना त्यांची आवडती तारीख मिळत नाहीये. काही महिन्यांपूर्वीच सलमान खान आणि कतरिना कैफच्या 'टाइगर जिंदा है'साठी ख्रिसमसची तारीख निश्चित झाली आहे. संजय दत्तसोबतच्या मैत्रीमुळे सलमान खान या तारखेत फेरफार करु शकत नाही. कारण या सिनेमाचा निर्माता यशराज बॅनर आहे. या सर्व कारणांमुळे हिराणींना त्यांच्या सिनेमाची रिलीज डेट 2018 मध्ये ढकलावी लागली आहे.  

एप्रिल 2018 वर सुरु आहे चर्चा  
हिराणींच्या टीमने 14 जानेवारी ही डेट सुचवली आहे. मात्र मार्केट रिसर्चनुसार ही तारीख सिनेमाच्या रिलीजसाठी योग्य नाही. या तारखेला पोंगल आहे आणि दक्षिणेतील अनेक बड्या स्टार आणि मोठ्या बजेटचे सिनेमे रिलीज होणारेय. त्यामुळे हिंदी फिल्मसाठी चांगला रिस्पॉन्स आणि थिएटर मिळणार नाही. टीमची नजर आता एप्रिल 2018 च्या पहिल्या आठवड्यावर आहे. आयपीएल सुरुवातीच्या आठवड्यात आहे. आयपीएलपूर्वी पहिला आठवडा रिकाम आहे. शिवाय शाळा-कॉलेजला सुटी सुरु होते. याशिवाय जूनमध्ये आयपीएल संपल्यानंतरच्या आठवडयाचाही विचार सुरु आहे.  
बातम्या आणखी आहेत...