आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तची पत्नी मान्यताने केले आहे B-ग्रेड चित्रपटांत काम, पूर्वीचे नाव होते \'दिलनवाज\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय दत्तबरोबर मान्यता. दुसऱ्या फोटोत तिच्या 'लव्हर्स लाइक अस' मधील सीन. - Divya Marathi
संजय दत्तबरोबर मान्यता. दुसऱ्या फोटोत तिच्या 'लव्हर्स लाइक अस' मधील सीन.
मुंबई - संजय दत्त लवकरच त्याचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'भूमी' मध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या सेटवर नेहमी मान्यता आणि संजय दत्तची मुले दिसायची. संजयने मान्यताबरोबर फेब्रुवारी 2008 मध्ये लग्न केले होते. 22 जुलै 1979 रोजी मुंबईत जन्मलेल्या मान्यताचे मूळ नाव दिलनवाज शेख होते. मात्र ती लहानाची मोठी झाली ते दुबईत. दुबईतून मुंबईत आलेल्या मान्यताला सक्सेसफुल अॅक्ट्रेस बनायचे होते. पण तिला एकही मोठी भूमिका मिळाली नाही. त्यामुळे ती 'B' ग्रेड चित्रपटांत काम करायला लागली होती. 

अशी झाली होती, संजय दत्त आणि मान्यताची पहिली भेट.. 
मान्यता आणि संजय दत्तची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले आणि मान्यताने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. संजय दत्तला माहिती होते की मान्यताने 2005 मध्ये B ग्रेड चित्रपट 'लव्हर्स लाइक अस' मध्ये काम केले आहे. त्याला ते आवडत नव्हते. तिने अशा चित्रपटांत काम करू नये असे संजय दत्तला वाटत होते. 
 
20 लाखात खरेदी केले चित्रपटाचे हक्क 
संजय दत्तने मान्यताच्या या चित्रपटाचे राइट्स 20 लाखाक खरेदी केले. मान्यताच्या प्रेमात तो एवढा पागल झाला होता की, त्यांनी मार्केटमधून या चित्रपटाच्या सीडी आणि डीव्हीडी हटवण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावली. 
 
 पुढील स्लाइड्सवर.. मान्यताच्या आधी हिच्याची होते संजय दत्तचे अफेयर.. 
 
बातम्या आणखी आहेत...