आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र आईसोबत पहिल्यांदा दिसली संजय दत्तची मुलगी, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त आणि पत्नी मान्यता दत्त यांच्यातील दुरावा आता कमी झाला आहे. अलीकडेच मान्यता त्रिशालाची भेट घ्यायला न्यूयॉर्कमध्ये पोहोचली होती. येथे दोघींनी बराच वेळ एकत्र घालवला. त्रिशाला आणि मान्यता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये दोघीही अतिशय आनंदी दिसत आहेत. मान्यताने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, maanayataThe lionesses Dutt ladies in the house..New York times at its best #usa #dutts. तर त्रिशालाने अकाऊंटवर फोटो पोस्ट करुन लिहिले, missing papa dukes… but seeing you soon!
 

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे. 1996 साली ब्रेन ट्युमरने रिचा शर्माचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्रिशाला तिच्या आजीआजोबांसोबत न्यूयॉर्कमध्ये राहते. जेव्हा संजय दत्तने मान्यतासोबत तिसरे लग्न केले होते, तेव्हा या लग्नामुळे त्रिशाला आनंदी नसल्याचे वृत्त आले होते. पण आता दोघींचे हे लेटेस्ट फोटो आणि त्यांची केमिस्ट्री बघता, दोघींमधील दुरावा मिटला असल्याचे दिसून येते.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, संजय दत्तची पत्नी आणि मुलगी त्रिशालाचे आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...