(फाइल फोटो- डावीकडे (वर) - पहिली पत्नी रिचासोबत संजय, (खाली)- माधुरी दीक्षित आणि संजय, उजवीकडे (वर) - दुसरी पत्नी रेहासोबत संजय, (खाली) - तिसरी पत्नी मान्यतासोबत संजय दत्त)
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्याला कायम वादाची किनार राहिली आहे. बालपणापासून ते आत्तापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. 29 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या संजयचा आज 56 वा वाढदिवस आहे. सध्या तो पुण्यातील येरवडा तुरुंगात असल्यामुळे त्याची पत्नी मान्यता त्याला भेटायला तुरुंगात गेली आहे. मान्यता संजयच्या आयुष्यात आलेली सातवी महिला आहे.
संजय दत्त सुनील आणि नर्गिस यांचा मुलगा आहे. प्रिया आणि नम्रता त्याच्या बहिणी आहेत. संजयचे सुरुवातीच शिक्षण लाँरेन्स स्कूलमध्ये झाले. तारुण्यात पदार्पण करताना अनेक वादांना त्याला सामोरे जावे लागले. कधी वाईट सवयींमुळे तर कधी अंडरवर्ल्डसोबतच्या संबंधांमुळे तो कायम वादात राहिला. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला तुरुंगवारीसुद्धा करावी लागली.
आईच्या निधनामुळे मोठा धक्का बसला होता...
आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणा-या अभिनेत्री नर्गिस यांचे 1981 कॅन्सरमुळे निधन झाले. संजयचा पहिला सिनेमा रॉकीच्या प्रीमिअरचा अगदी तीन दिवसांपूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आईच्या अकाली निधनामुळे संजयला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी तो ड्रग्सच्या आहारी गेला. याप्रकरणी 1982 मध्ये त्याला तुरुंगातसुद्धा जावे लागले होते. दोन वर्षे सिनेमांपासून आणि आपल्या देशापासून दूर राहिल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपले करिअर सुरु केले होते.
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी समोर आले नाव...
1993च्या मुंबईत बॉम्बस्फोटप्रकरणी त्याच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याच्या आरोप होता. याप्रकरणी सध्या तो पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
चर्चेत राहिले माधुरी दीक्षितसोबतचे अफेअर...
संजय दत्तच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या. मात्र नव्वदच्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतचे त्याचे अफेअर बरेच गाजले. मात्र त्यावेळी संजय विवाहित होता. त्यामुळे माधुरीचे वडील त्यांच्या नात्याच्या विरोधात होते. त्याचकाळात संजयला अचानक तुरुंगवास झाला. या घटनेनंतर माधुरीने त्याच्यासोबतचे आपले नाते संपुष्टात आणले. तेव्हापासून आजपर्यंत हे दोघे स्टार्स कधीही एकत्र दिसले नाहीत.
अनेक महिलांसोबत जुळले नाव...
माधुरीशिवाय संजयचे नाव अभिनेत्री टीना मुनीमसोबतसुद्धा जुळले होते. इंडस्ट्रीत पदार्पण केल्याकेल्या या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. दोघे 'रॉकी' या सिनेमात एकत्र झळकले होते. मात्र लवकरच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेल लीजा रे आणि मॉडेल नादिरासह संजयचे नाव जुळले. मात्र या दोन्ही लिंकअप्सच्या केवळ चर्चा रंगल्या.
मान्यतासह केले तिसरे लग्न...
1987 मध्ये संजयचे लग्न अभिनेत्री रिचा शर्मासोबत झाले होते. संजयचे हे पहिले लग्न होते. दोघांना त्रिशाला नावाची एक मुलगी असून ती अमेरिकेत असते. लग्नाच्या नऊ वर्षांनी रिचाचे कॅन्सरमुळे निधन झाले. अमेरिकेत अनेक वर्षे रिचावर उपचार सुरु होते. त्यानंतर 1998मध्ये संजयने रिया पिल्लईसह लग्न केले. मात्र 2005मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2008 मध्ये मान्यतासह संजयने तिसरे लग्न केले.
संजयला आहेत तीन मुले...
संजयच्या थोरल्या मुलीचे नाव त्रिशाला आहे. ती अमेरिकेत आपल्या आजीआजोबांसह राहते. त्रिशाला संजय आणि त्याची पहिली पत्नी रिचाची मुलगी आहे. तर तिसरी पत्नी मान्यतापासून संजयला दोन जुळी मुली आहेत. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
खासगी समारंभात केले लग्न...
संजय आमि मान्यताने दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केले. गोव्यात अगदी साध्या समारंभात दोघांचे लग्न झाले. या लग्नात सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टीची खास उपस्थिती होती.
संजय दत्तचे प्रमुख सिनेमे...
रॉकी (1980), विधाता (1982), जान की बाजी (1985), नाम (1986), थानेदार (1990), सडक (1991), साजन (1991), यलगार (1992), खलनायक (1993), दाग- द फायर (1999), हसीना मान जाएगी (1999), वास्तव (1999), खूबसूरत (1999), बागी (2000), मिशन कश्मीर (2000), कांटे (2002), मुन्नाभाई एमबीबीएस (2003), प्लान (2004), परिणीता (2005), लगे रहो मुन्ना भाई (2006), धमाल (2007), ऑल द बेस्ट (2009), रास्कल्स (2011), अग्निपथ (2012), सन ऑफ सरदार (2012), पुलिसगिरी (2013)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा संजय आणि मान्यताच्या लग्नाची खास छायाचित्रे....