आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर रिलीज झाल्या या अॅक्टरच्या 10 फिल्म, यामुळे नाही केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजीवकुमार यांचे हेमामालिनीवर खूप प्रेम होते. - Divya Marathi
संजीवकुमार यांचे हेमामालिनीवर खूप प्रेम होते.
'शोले' मधील ठाकूर अर्थात संजीव कुमार यांची आज 32वी डेथ अॅनिव्हर्सरी आहे. 6 नोव्हेंबर 1985 ला वयाच्या 47 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले होते. संजीवकुमार यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. 10 चित्रपट तर असे होते, जे त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज झाले. या यशस्वी अभिनेत्याने शेवटपर्यंत लग्न केले नव्हते, त्याचे कारण होत त्यांचा हार्ट प्रॉब्लेम. त्यांच्या कुटुंबातील बहुतेक जणांचे पन्नाशीच्या आत निधन झाले होते. 
 
हेमा मालिनीच्या प्रेमात होते संजीवकुमार
- बॉलिवूडमध्ये अशीही चर्चा आहे, की संजीवकुमार यांचे हेमा मालिनीवर खूप प्रेम होते. त्यांनी हेमाच्या घरी लग्नाचा प्रस्तावही पाठवला होता. मात्र हेमाने तो नाकारला होता, तेव्हा तिला धर्मेंद आवडत होता. तर, दुसरीकडे सुलक्षणाचे संजीवकुमारवर जीवापाड प्रेम होते. मात्र संजीवकुमारांच्या मनावर राज्य करत होती हेमा. त्यांनी सुलक्षणाला नाही म्हटले. सुलक्षणाने संजीवकुमार यांना विविध पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र हे लग्न होऊ शकले नाही आणि अचानक संजीवकुमार यांचे निधन झाले. 
 
संजीवकुमारांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले हे चित्रपट 
- संजीवकुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 10  फिल्म रिलीज झाल्या होत्या. यातील बहुतेक फिल्मचे शूटिंग राहिले होते. यांच्या कथानकात थोडा बदल करुन फिल्म रिलीज करण्यात आल्या. संजीवकुमार यांच्या मृत्यूनंतर तब्बल 8 वर्षांनी 'प्रोफेसर की पडोसन' (1993) रिलीज झाला होता. याशिवाय  'कातिल' (1986), 'हाथों की लकीरें' (1986), 'बात बन जाए' (1986), 'कांच की दीवार' (1986), 'लव अँड गॉड' (1986), 'राही' (1986), 'दो वक्त की रोटी' (1988), 'नामुमकिन' (1988), 'ऊंच नीच बीच' (1989)  यांचा समावेश आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, संजीवकुमार यांच्याबद्दलचे फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...