आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करणच्या पार्टीत दीपिका-कतरिनासह पोहोचल्या त्याच्या आगामी \'हीरोईन्स\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर आणि सारा अली खान - Divya Marathi
कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर आणि सारा अली खान
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा 'स्टायलिश मॅन' म्हणून ओळखला जाणारा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने नुकतीच वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने नुकताच बाबा झालेल्या करणने गुरुवारी रात्री एक ग्रॅण्ड पार्टी होस्ट केली. या पार्टीत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, रितेश देशमुख, संजय दत्त, मान्यता दत्ता, सुशांत सिंह राजपूत, आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव, चंकी पांडे, वरुण धवन, हर्षवर्धन कपूर, सोनम कपूर, सोनाली बेंद्रे, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, किर्ती सेनन, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, आदिती राव हैदरी, हृतिक रोशनसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले. अभिनेता शाहरुख खानसुद्धा त्याची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यनसोबत पार्टीत सहभागी झाला होता. 
 
या सर्व सेलिब्रिटींमध्ये दोन चेह-यांनी मीडियाचे लक्ष वेधून घेतले. आम्ही बोलतोय ते करण जोहरच्या आगामी हीरोईन्सविषयी... सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आणि श्रीदेवी-बोनी कपूर यांची कन्या जान्हवी कपूरसुद्धा करणच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाल्या.  PICS: करणच्या पार्टीत गर्लफ्रेंडसोबत पोहोचले सिद्धार्थ-वरुण, हे सेलेब्सही दिसले जोडीदारासोबत
 
 
सारा आणि जान्हवीला फिल्म इंडस्ट्रीत लाँच करणार करण जोहर...
जान्हवी आणि सारा यांना बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहर फिल्म इंडस्ट्रीत लाँच करणार असल्याची चर्चा आहे. मराठी फिल्म 'सैराट'च्या हिंदी व्हर्जनमध्ये जान्हवी तर 'स्टूडंट ऑफ दि इयर-2' मधून सारा अली खानला करण लाँच करणारेय. पण अद्याप या दोन्ही सिनेमांची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण करणच्या पार्टीत या दोघी पोहोचल्या याचा अर्थ लवकरच करण या दोघींना इंडस्ट्रीत लाँच करणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. करणच्या बर्थडे पार्टीत अवतरले अवघे बॉलिवूड, पाहा ‘Mother of All Bashes’

पुढील स्लाईड्सवर, बघा, करणच्या पार्टीतील लखलखते तारांगण... 
बातम्या आणखी आहेत...