आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खान आणि जान्हवी कपूरचे ग्लॅमरस फोटोशूट, करण जोहर करणार लाँच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मल्टी कलर लहेंग्यात सारा अली खान आणि पिंक लहेंग्यात जान्हवी कपूरने केले फोटोशूट. - Divya Marathi
(मल्टी कलर लहेंग्यात सारा अली खान आणि पिंक लहेंग्यात जान्हवी कपूरने केले फोटोशूट.
मुंबईः सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूर यांनी अलीकडेच फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेल्या ड्रेसेसमध्ये एक ट्रेडिशनल फोटोशूट केले आहे.  या फोटोशूटमध्ये सारा ब्लू अँड व्हाइट आणि मल्टी कलर लहेंग्यात दिसली. तर जान्हवीने पिंक अँड व्हाइट कलरचा लहेंगा परिधान केला होता. या फोटोशूटची खास झलक दोघींनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. यामध्ये सारा आणि जान्हवी यांचा स्टनिंग लूक लक्ष वेधून घेतोय. 

सारा आणि जान्हवीला फिल्म इंडस्ट्रीत लाँच करणार करण जोहर... 
जान्हवी आणि सारा यांना बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहर फिल्म इंडस्ट्रीत लाँच करणार असल्याची चर्चा आहे. मराठी फिल्म 'सैराट'च्या हिंदी व्हर्जनमध्ये जान्हवी तर 'स्टूडंट ऑफ दि इयर-2' मधून सारा अली खानला करण लाँच करणारेय. पण अद्याप या दोन्ही सिनेमांची अधिकृत घोषणा झालेली नाही.  

पुढील 5 स्लाइड्सवर बघा सारा आणि जान्हवी यांचे फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...