आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमे-याला बघून सैफच्या लेकीने लपवला चेहरा, तथाकथित प्रियकरासोबत दिसली करिश्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः सैफ अली खान, त्याची पत्नी करीना कपूर आणि मुलगी सारा अली खान शनिवारी रात्री पृथ्वी थिएटरमध्ये पोहोचले होते. यावेळी फोटोग्राफर्सना बघून सारा चेहरा लपवताना दिसली. सैफ, करीना आणि साराशिवाय करिश्मा कपूर तिचा तथाकथित बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत यावेळी पृथ्वी थिएटरबाहेर दिसली. विशेष म्हणजे रणधीर कपूर यांच्या बर्थडे पार्टीत करिश्मा पाहुण्यांसोबत संदीपची ओळख करुन देताना दिसली. त्यामुळे आता या दोघांच्या नात्याला कपूर घराण्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे दिसत आहे. 

रणबीर कपूरसुद्धा दिसला.. 
पृथ्वी थिएटरबाहेर कपूर बहिणींव्यतिरिक्त अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसुद्धा दिसले. यावेळी रणबीर संजय दत्तच्या लूकमध्ये दिसला. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर संजय दत्तची भूमिका साकारतोय. यासाठी त्याने त्याचे 15 किलो वजन वाढवले आहे. हा सिनेमा राजकुमार हिराणी दिग्दर्शित करणार आहेत. हे सेलिब्रिटी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पृथ्वी थिएटरमध्ये आले होते. 

पुढील स्लाईड्सवर बघा, यावेळी क्लिक झालेले या सेलेब्सचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...