आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाच्या लग्नात गॉर्जियस लूकमध्ये दिसली सरगुन मेहता, नवऱ्याबरोबर केला तुफान डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्हीवरील फेमस बहू सरगुन मेहताचा भाऊ पुलकितचे लग्न गोव्यात आयोजित करण्यात आले होते. सरगुनने या लग्नाचे काही निवडक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. त्यात सरगुन सुंदर ट्रेडिशनल लेहंग्यापासून ते कॉकटेल पार्टीतील वेस्टर्न लूकमध्येही अत्यंत गॉर्जियस दिसत आहे. लग्नामध्ये सरगुनने नताशा दलालने डिझाइन केलेले आऊटफिट परिधान केले, तर तिचा पती अॅक्टर रवी दुबेने डिझायनर प्रणव सूदचे आऊटफिट परिधान केले होते. यादरम्यान टीव्ही अॅक्टर ऋत्विक धंजानी, अॅक्ट्रेस आशा नेगी आणि रिद्धि डोगराही दिसले. 

नवऱ्याबरोबर केला जोरदार डान्स.. 
- सरगुनने इन्स्टाग्रामवर संगीत सेरेमनीपासून ने इतर अनेक व्हिडीओज शेयर केले आहेत. त्यात ती पती रवी दुबे आणि मित्रांबरोबर जोरदार डान्स करताना दिसली. 
- दोघांनी डीजेवर एक सोलो परफॉर्मन्स केला तसेच वऱ्हाडींबरोबरही चांगलेच ठुमके लावले. 
- रवी दुबे आणि सरगुन नुकतेच रियालिटी शो 'बिग बॉस-11' मध्ये स्पेशल गेस्ट म्हणून झळकले. 

रियलिटी शोमध्ये रवीने केले होते सरगुनला प्रपोज 
- टीव्ही इंडस्ट्रीचे फेमस कपल रवी दुबे आणि सरगुन मेहता यांची लव्ह स्टोरीही 'नच बलिए' सिझन पाचमध्ये चर्चेचा विषय होती. 
- रवीने या शोमध्ये सरगुनला प्रपोज केले होते. शो संपताच या कपलने 7 डिसेंबर 2013 ला लग्न केले होते. 
- दोघांची लव्ह स्टोरी '12/24 करोल बाग' (2009-2010) मध्ये काम करताना सुरू झाली होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. 
- 2011-12 मध्ये सरगुन 'फुलवा' मालिकेत लीड रोलमध्ये लोकप्रिय झाली होती, तर रवी 'जमाई राजा' आणि 'सास बिना ससुराल' मधून प्रसिद्ध झाला होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सरगुनच्या भावाच्या लग्नातील फोटो आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा, सरगुनच्या डान्सचा व्हिडीओ PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...