आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: अशा स्थितीत जगतोय पंजाबी चित्रपटांचा एकेकाळचा हा सुपरस्टार, राहायला नाही घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश कौल यांचे हिंदीसोबत पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये मोठे नाव आहे. असे म्हणतात की प्रादेशिक चित्रपटांमध्ये सतीश यांच्याइतके नाव कोणीच कमवले नाही. सतीश यांना पंजाबी चित्रपटातील अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आतापर्यंत जवळपास 300 चित्रपटात काम केले आहे. हिंदी चित्रपटांत त्यांनी देवानंद, दिलीप कुमार आणि शाहरुख खानसोबत काम केले आहे. आज त्यांनी वयाची 62 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कुठे आहेत सतीश कौल. राहायला नाही घर, उपचारानंतर हॉस्पीटलमध्येच होते काही दिवस..

वर्षभरापूर्वी बाथरुममध्ये पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बरे होऊनदेखील त्यांना रुग्णालयातच दिवस काढावे लागत आहे. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर त्यांच्याकडे राहायला जागा नाही. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, ''पूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होतो. मात्र उपचारांसाठी पैसे नसल्याने मला पटियालातील एका छोट्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.''

पुढच्या स्लाईडवर वाचा, वाईट काळात पत्नीने सोडली साथ...
बातम्या आणखी आहेत...