आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शालेय दिवसांत असे दिसायचे SRK, ऐश, सलमानसह हे सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे वर - आपल्या आईसोबत ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान (खाली), क्रिकेट खेळताना शाहरुख खान.)
मुंबईः प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातील शालेय दिवस मुळीच विसरु शकत नाही. मग सामान्य असो किंवा सिनेमांत काम करणारे स्टार्स, प्रत्येक जण आपल्या शालेय जीवनाच्या आठवणीत रमत असतो. छायाचित्रांच्या माध्यमातून आपण गतकाळाच्या आठवणीत रमू शकतो. divyamarathi.com ने शाहरुख खान, सलमान खान, माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रासह अनेक स्टार्सची शालेय दिवसांच्या छायाचित्रांचे कलेक्शन केले आहे.
वरील छायाचित्र ऐश्वर्या राय बच्चन हिच्या शालेय जीवनातील आहे. तिची आई तिला तयार करताना दिसत आहे. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर हायस्कूल आणि जयहिंद कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. दुसरे छायाचित्र सलमान खानचे आहे. सलमानने वांद्र्यातील St.Stanislaus हायस्कूलमधून आपले शिक्षण पुर्ण केले. तिसरे छायाचित्र सुपरस्टार शाहरुख खानचे असून मैदानात क्रिकेट खेळताना तो दिसतोय. शाहरुखने दिल्लीतील कोलंबा स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शालेय जीवनात कसे दिसायचे तुमचे फेव्हरेट स्टार्स...