आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

School Days मध्ये असे दिसायचे सलमान-ऐश्वर्या, बघा बी टाऊन स्टार्सचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शाळेतील दिवस प्रत्येकाला आजही भावूक करतात. प्रत्येकाला 'ते' दिवस आठवल्यावर मन भरून येते. सामान्य व्यक्तीपासून कलाकारांपर्यंत प्रत्येकजण आपले शालेय दिवस आठवतात. कुणालाही आपल्या शालेय दिवसांत पुन्हा जाण्याची इच्छा होते. मात्र असे शक्य नाहीये. परंतु त्या दिवसातल्या फोटोंमधून जून्या आठवणी जाग्या होतात. आज आम्ही तुम्हाला सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, सिध्दार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड स्टार्सच्या शालेय जीवनातील खास फोटो दाखवणार आहोत.
पहिला फोटो सलमान खानच्या स्कूल डेजमधील आहे. दुस-या फोटो ऐश्वर्या राय बच्चनचा शालेय दिवसांतील असून तिची आई तिला तयार करताना दिसत आहेत. ऐशने मुंबईतील आर्य विद्या मंदिर हायस्कूल आणि जय हिंद कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तिस-या फोटो ऐश्वर्या शिक्षिकेकडून अवॉर्ड घेताना दिसत आहे.
ग्वालिअर आणि मुंबईमध्ये झाले सलमानचे शिक्षण-
सलमानने सुरुवातीचे शिक्षण ग्वालिअरच्या Scindia Boarding School मध्ये घेतले. नंतर मुंबईच्या St. Stanislaus High School जॉइन केले. त्याने Elphinstone कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि दुस-या वर्षांत शिक्षण सोडून दिले.
2nd रँक आल्याने 15 मिनिटे रडली होती ऐश्वर्या
मंगलोरहून मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर ऐश्वर्याने आर्य विद्या मंदिर हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. आर्य विद्या मंदिर हायस्कूलमधील एका प्राथमिक शिक्षकाच्या सांगण्यानुसार, ऐश्वर्या साडेतीन वर्षांची असताना शाळेत यायला लागली होती. हुशार असल्यासोबतची ती नेहमी पहिली यायची. परंतु 10वीत असताना तिचा दुसरा क्रमांक आला आणि ती मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये 15 मिनिटे रडत होती.
शालेय दिवसांत कसे दिसत होते तुमचे लाडके कलाकार, जाणून घ्या त्यांच्या शाळेचे नाव पुढील स्लाइड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...