आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Beefed Up For Aishwarya, Look When Actresses Molested In Public

ऐश्वर्याने वाढवली सुरक्षा, या अभिनेत्रींसोबत घडल्या आहेत छेडछाडीच्या घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः ऐश्वर्या राय बच्चन आणि अमिषा पटेल - Divya Marathi
फाइल फोटोः ऐश्वर्या राय बच्चन आणि अमिषा पटेल

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्या आगामी 'जज्बा' सिनेमाचे प्रमोशन सुरु करणार आहे. याकाळात तिची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळणार हे नक्की. हीच गोष्ट लक्षात घेऊन ऐश्वर्याने स्वतःच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
अलीकडेच ऐश्वर्या जज्बाच्या रॅप अप पार्टीच्या निमित्ताने मुंबईतील एका पबमध्ये पोहोचली होती. यावेळी ती चाहत्यांच्या गराड्यात अडकली. येथून बाहेर पडणे तिच्यासाठी खूपच अवघड झाले होते. याच कारणामुळे तिने आपली सिक्युरिटी वाढवण्याचा निर्णय घेतला. आता प्रमोशनच्या काळात तिच्यासोबत तब्बल 15 ते 20 बॉडीगार्ड्स असणारेय.
फॅन्सच्या गर्दीतून स्वतःचा बचाव करण्यासाठी ऐश्वर्याने वेळीच आपल्या सिक्युरिटीत वाढ केली. मात्र अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना सिक्युरिट कमी असल्यामुळे किंवा कधीकधी नसल्याने छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागले. अशावेळी अभिनेत्रींना लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांची सार्वजनिक ठिकाणी छेड काढण्यात आली...
अमिषा पटेलः गोरखपुरमध्ये तरुणाने जबरदस्ती केला स्पर्श
ही घटना याचवर्षी एप्रिल महिन्यात घडली होती. अमिषा एका ज्वेलरी शोरुमच्या लाँचिंगच्या निमित्ताने गोरखपुर (उत्तर प्रदेश) येथे गेली होती. त्यावेळी अमिषाला बघण्यासाठी शोरुमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. शोरुमच्या दिशेने जात असताना वाटेत एका तरुणाने अमिषाला जबरदस्ती स्पर्श केला. तरुणाच्या अशा कृत्यामुळे अमिषाचा पारा चांगलाच चढला आणि तिने त्याच्या थोबाडीत लगावली.
पुढे जाणून घ्या, आणखी काही अभिनेत्रींविषयी...