आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Did You Know: 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अनुष्का शर्माला तुम्ही पाहिले होते का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अनुष्का शर्मा बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'रब ने बना दी जोडी' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या पहिल्या सिनेमाच्या रिलीजच्या दोन वर्षाआधीच अनुष्काची झलक मोठ्या पडद्यावर बघायला मिळाली होती, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं, तर तुमचा विश्वास बसेल का. होय हे खरे आहे. संजय दत्त स्टारर 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमात अनुष्काचे एक झलक होती. पण ती कुठल्या दृश्यात दिसली होती, हे कदाचित प्रेक्षकांना नीटसे आठवतही नसेल.
राजकुमार हिराणी यांच्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमातील एका दृश्यात भिंतीवर अनुष्काचे छायाचित्र लागलेले दिसत आहे. विशेष म्हणजे याविषयी अनुष्काला काहीच कल्पना नव्हती. जेव्हा तिला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने ते छायाचित्र सोशल मीडियावर रिट्विट केले होते.
भिंतीवरील छायाचित्रात दिसणारी तरुणी एकेदिवशी आपल्या सिनेमातील लीड अॅक्ट्रेस असेल याची कल्पनासुद्धा त्याकाळी राजकुमार हिराणी यांना नसावी.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमातील अनुष्काची छोटीशी झलक...