आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये केली डिग्री प्राप्त, हे आहेत बॉलिवूडचे Highly Educated Celebs

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः वरुण धवन आणि परिणिती चोप्रा)
मुंबईः अल्पावधतीच बॉलिवूड आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सामील झालेला वरुण धवन आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. 24 एप्रिल 1987 रोजी दिग्दर्शक डेविड धवन यांच्या घरी वरुणचा जन्म झाला.
2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे वरुणने फिल्मी दुनियेत एन्ट्री घेतली. 'मैं तेरा हीरो', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बदलापूर' या सिनेमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली. लवकरच तो 'दिलवाले' आणि 'एबीसीडी 2' या सिनेमात झळकणार आहे.
खरं तर अभिनयासाठी उच्च शिक्षणाची गरज नसते. मात्र वरुणने अभिनयात नशीब आजमावण्यापूर्वी आपले शिक्षण पूर्ण केले. केवळ वरुणच नव्हे तर बॉलिवूडमध्ये आणखी काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी अभिनयात नशीब आजमावण्यापूर्वी शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला. काही सेलिब्रिटींनी तर केवळ एखाद्या विषयात केवळ आवड होती म्हणून पदवी प्राप्त केलेली आहे.
वरुण धवनः परदेशातून घेतली बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिग्री
'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या वरुण धवनने यूकेतील नॉटिंघम युनिव्हर्सिटीतून बिझनेस मॅनेजमेंट या विषयाची पदवी प्राप्त केली आहे. भारतात आल्यानंतर त्याने करण जोहरचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणे सुरु केले होते.
परिणीती चोप्राः मॅनचेस्टर बिझनेस स्कूलमधून ऑनर्स डिग्री
परिणीती वयाच्या 17व्या वर्षी उच्चशिक्षणासाठी लंडनला रवाना झाली होती. इनव्हेस्टमेंट बँकर होण्याची तिची इच्छा होती. अंबालाच्या ‘कॉन्व्हेंट ऑफ जीझस अ‍ॅण्ड मेरी स्कूल’मध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर ती लंडनमधील मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये दाखल झाली. येथे तिने बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्स डिग्री प्राप्त केली. त्यानंतर यशराज फिल्म्स’च्या मार्केटिंग आणि पीआर कन्सल्टंटची नोकरी तिने केली. तिथेच तिला ‘लेडीज वर्सेस रिकी बेहेल’ या सिनेमात अभिनयाची पहिली संधी मिळाली.
पुढील स्लाईड्समध्ये, भेटा बॉलिवूडमधील उच्चशिक्षित सेलिब्रिटींना...