गतकाळातील अभिनेते जितेंद्र यांचा काल (7 एप्रिल) वाढदिवस होता. 7 एप्रिल 1942मध्ये अमृतसर त्यांचा जन्म झाला. एका पंजाबी कुटुंबात जन्मलेले जितेंद्र यांच्या वडिलांचा ज्वेलरीचा व्यवसाय होता. त्यांचे शालेय शिक्षण सेंट सेबास्टीन्समध्ये झाले.
जितेंद्र यांना सर्वात पहिला ब्रेक 1958मध्ये व्ही. शांताराम यांनी दिला. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड अनेक हिट सिनेमे दिले. 'मेरे हमसफर', 'खिलौना', 'परिचय', 'धरमवीर', 'खुशबू', 'फर्ज', 'हिम्मतवाला' हे सिनेमे त्यात सामील आहेत.
जितेंद्र आता लाइमलाइटपासून दूर झाले आहेत. परंतु त्यांची मुलगी एकता आणि मुलगा तुषार इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. जितेंद्र यांचे अनेक चाहते आहेत, त्यांना
आपल्या आवडत्या स्टारविषयी जाणून घेण्याची नेहमीच उत्सूकता असते. अशातच आम्ही तुम्हाला जितेंद्र यांच्या अलीशान घराची छायाचित्रे दाखवत आहोत. मागील वर्षी जितेंद्र यांच्या घरी दिवाळी सेलिब्रेशनसुध्दा झाले होते. त्यात अनेक सेलेब्स सामील झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जितेंद्र यांच्या घराची छायाचित्रे...