आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली 2'साठी तयार झाला नवीन सेट, पाहा Leak झालेले कॉन्सेप्ट Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली 2'च्या सेटचा लीक झालेला कॉन्सेप्ट फोटो - Divya Marathi
'बाहुबली 2'च्या सेटचा लीक झालेला कॉन्सेप्ट फोटो
मुंबई: 'कटप्पाने बाहुबली का मारले?' या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी जगभरातील प्रेक्षक 'बाहुबली 2'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बाहुबली 2' सध्या अंडर प्रॉडक्शन आहे. सिनेमाचे आर्ट डायरेक्टर साबू सायरिलने या सिनेमाचा नवीन सेट तयार केला आहे. एका लीडिंग न्यूज वेबसाइटला दिलेला मुलाखतीत साबूने सिनेमाच्या सेट आणि शूटिंगविषयी सांगितले.
300 ते 500पेक्षा जास्त लोक करताय काम...
साबू यांनी सांगितले, 'बाहुबली 2'च्या सेटच्या निर्मितीसाठी 300 ते 500 लोकांनी काम केले. त्यात पेंटर्स, कारपेंटर्सपासून कंस्ट्रक्शन वर्कर्स आणि आर्टिस्टपर्यंत अनेक लोक सामील आहेत. साबू यांनी सांगितले, की 'बाहुबली' त्यांच्या करिअरचा सर्वात मोठा सिनेमा आहे. ते सध्या जवळपास 10 सिनेमांवर काम करत आहेत. साबू सांगतात, 'बाहुबली' त्यांच्यासाठी आव्हानत्मक सिनेमा आहे. एका ऐतिहासिक आणि युध्दात मोठे सेट, पात्र, वॉरियर्स जंगल, अॅनिमल्स आणि रॉयल्टी यांच्यावर लक्ष द्यावे लागते. परंतु ते या आव्हानाला एन्जॉय करत होते. 'बाहुबली'सोबतच ते ज्या सिनेमांवर काम करत आहेत, त्यामध्ये रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर '2.0'सुद्धा सामील आहे.
'बाहुबली 2'मध्ये काय काम करत आहेत...
साबू यांनी सांगितले, या सिनेमासाठई ते मेकॅनिकल सापांपासून घोडे आणि हत्तीपर्यंत सर्व गोष्टींवर काम करत आहेत. युध्दादरम्यान खाली कोसळणा-या घोड्यांना रिअल दाखवणे शक्य नसते. तसेच कम्प्यूटर ग्राफिक्सव्दारे दाखवणे सोपे नसते. म्हणून त्यांनी एका विशेष मटेरिअल्सने प्राण्यांनी निर्मिती केली. जे सिनेमांत बनावट असूनदेखील रिअल वाटतील. शिवाय त्यांनी युध्दासाठी शस्त्रास्त्रे आणि पोशाख इत्यादींवर काम केले आहे. साबू असेही म्हणतात, की पहिल्यांदा त्यांनी इंडस्ट्रीत इतक्या मोठ्या वस्तूंवर मोठ्याप्रमाणात काम केले आहे. त्यातील अनेक वस्तू खूप महागड्या आहेत. परंतु गरजेच्या असल्याने त्यांना त्या घ्याव्या लागल्या.
काय-काय वापरले?
साबू सांगतात, की सिनेमाच्या सेट आणि युध्दाच्या सामग्री जिवंत वाटण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट्सचा वापर केला आहे. ते सांगतात, 'सिनेमाच्या दोन्ही भागांत आम्ही 3D प्रिटींगचा वापर केला आहे. त्यानंतर मी पहिल्यांदा बारकार्बन फायबरचा वापर केला आहे. या मटेरिअलने हेलिकाफ्टरच्या ब्लेड्स बनवल्या जातात. हे हलके-फुलके परंतु मजबूत असते. याशिवाय, इंटीग्रेटेड रबर फोम, जिमच्या मशीन्स आणि सायकल बार्समध्ये वापरले जाते. याच्या माध्यमातून आम्ही शस्त्र बनवले. हे दिसायला मजबूत दिसतात. परंतु ते मऊ असतात आणि कलाकारांना यामुळे नुकसान पोहोचत नाही. युद्धाच्या सिक्वेन्समध्ये आम्ही चेन्स, हेलमेट, रॉक्स आणि बाऊल्डर्सचा वापर केला. प्रभासने मागील भागात जे शिवलिंग खांद्यावर उचलले होते, तेसुध्दा इंटीग्रेटेड रबर फोमने बनलेले होते. आम्ही सिनेमासाठी पाच वेगवेगळे शिवलिंग तयार केले होते.'
फ्लेक्सी फोमने बनवले माणसांचे डमी आणि प्राणी...
साबू यांनी सांगितले, 'युध्दाच्या सिक्वेन्ससाठी माणसांचे डमी आणि प्राणी बनवण्यासाठी आम्ही फ्लेक्सी फोमचा वापर केला. प्रत्येक सीनवर दिग्दर्शक राजामौली यांच्यासोबत सखोल चर्चा झाली आणि अनेक संशोधनानंतर त्यांच्या सांगण्यानुसार काम केले गेले.'
पुढील वर्षी रिलीज होणार 'बाहुबली 2'...
एस एस राजामौलीच्या दिग्दर्शनात बनत असलेला 'बाहुबली 2' पुढील वर्षी 17 एप्रिलला रिलीज होणार आहे. सिनेमात प्रभास, राणा दुग्गबती, अमिषा शेट्टी, राम्या कृष्णन आणि सत्याराज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बाहुबली 2'च्या सेटचे काही कॉन्सेप्ट फोटो, जे मीडियामध्ये लीक झाले आहेत...
नोट : divyamarathi.com हे फोटो खरे असतील याची पुष्टी देत नाही. सर्व फोटो यू-ट्यूब चॅनल beepमधून घेण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...