आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'तील माहिश्मती साम्राज्य पर्यटकांसाठी खुले, एवढ्या कोटींमध्ये तयार झाला होता सेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामोजी फिल्मसिटीमध्ये तयार करण्यात आलेला माहिश्मतीचा भव्य सेट. - Divya Marathi
रामोजी फिल्मसिटीमध्ये तयार करण्यात आलेला माहिश्मतीचा भव्य सेट.
हैदराबाद - रामोजी फिल्म सिटीतील 'बाहुबली' मधील माहिष्मती साम्राज्य आणि इतर सेट्स आथा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. हा निर्णय दिवाळीचा उत्सव आणि पर्यटकांच्या मागणीमुळे घेण्यात आला. बाहुबलीमधील माहिष्मतीचा हा सेट 35 कोटींचा खर्च करून तयार करण्यात आला होता. 

500 लोकांनी 50 दिवसांत उभारला सेट.. 
चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये माहिष्मती साम्राज्याचा सेट तयार करण्यासाठी 28 कोटींचा खर्च आला होता. सिक्वलमध्ये त्याचसेटवर काही नवीन एलिमेंट्स जोडून चित्रपटाचे अनेक सीन शूट करण्यात आले. 
त्याशिवाय एका नव्या साम्राज्याचा सेटही तयार करण्यात आला. त्याच्या प्रोडक्शन डिझाइनसाठी 35 कोटींचा खर्च आला. हा सेट 500 लोकांनी सुमारे 50 दिवसांत तयार केला. 

रोज येतात 10 ते 15 हजार पर्यटक 
- दिवाळीच्या सुट्यांमध्ये टुरिस्ट्ससाठी 29 ऑक्टोबरपर्यंत खास उत्सव साजरा केला जात आहे. त्यासाठी रामोजी फिल्म सिटी सजवण्यात आली आहे. 
- रामोजी फिल्म सिटीचे मॅनेजर पवन कुमार यांच्यामते रोज 10 ते 15 हजार पर्यंटक रोज येत आहेत. 
 
2000 एकरमध्ये आहे रामोजी फिल्मसिटी.. 
- रामोजी फिल्मसिटीचे व्हाइस प्रेसिडेंट (पब्लिसिटी) एव्ही राव यांच्या मते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असलेल्या सुमारे 2 हजार एकरात पसरलेल्या या फिल्मसिटीत आतापर्यंत सुमारे 2500 हून अधिक चित्रपट शूट झाले आहेत. 
- जगातील सर्वात मोठी फिल्मसिटी असलेल्या रामोजीमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपटांचे शुटिंग झाले आहे. पण त्यातील काही मोजकी नावे सांगायची झाली तर, 'बाहुबली', चेन्नई एक्सप्रेस आणि विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर' यांचा समावेश आहे. 

500 हून अधिक सेट लोकेशन 
- रामोजी फिल्मसिटीमध्ये 500 हून अधिक सेट लोकेशन्स आहेत. वर्षभरात येथे सुमारे 200 चित्रपटांचे शुटिंग होते. 
- याठिकाणी शेकडो गार्डन, 50 हून अधिक स्टूडिओ फ्लोर, ऑथराइज्ड सेट्स, डिजिटल फिल्म तयार करण्याची फॅसिलिटी, आउटडोअर लोकेशन, हाय-टेक्नॉलॉजी लैब आहे. 
- याठिकाणी कॉस्च्युम डिझाइन लोकेशन, मेक-अप, सेट-तयार करणे, कॅमरा, चित्रपट तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे, ऑडियो प्रोडक्शन, डिजिटल पोस्ट प्रोडक्शन आणि फिल्म प्रोसेसिंगची सुविधा उपलब्ध आहे. 
- रामोजी फिल्म सिटीमध्ये एकाचवेळी 20 परदेशी तर 40 भारतीय चित्रपटांचे शुटिंग होऊ शकते. 

रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि प्लेग्राऊडपासून सर्वकाही.. 
रामोजी फिल्मसिटीमध्ये रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, मंदिर, महाल, पॉश कालोनी, शहर, गाव, जगल, समुद्र, नद्या, बाजार, हॉस्पिटल, कोर्ट, चर्च, गुरुद्वारा, मशीद, सेंट्रल जेल, खेळाचे ग्राऊंड असे सर्वकाही आहे. चित्रपट आणि स्क्रिप्टच्या डिमांडनुसार याठिकाणी अनेक गोष्टींत बदलही केले जातात. 'चेन्नई एक्सप्रेस' ची शुटिंग याठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशनवर झालेली आहे. 

पुढील स्लाइड्सवर, बाहुबलीमधील माहिश्मती साम्राज्याच्या सेटचे आणखी काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...