(डावीकडे - शाहरुखची बालपणीची छायाचित्रे आणि उजवीकडे - शाहरुखसोबत त्याचा चिमुकला
मुलगा अबराम खान)
शाहरुख खान आणि त्याचा चिमुकला मुलगा अबराम यांच्यामध्ये सर्वात हँडसम कोण? यावरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगतेय. मात्र या चर्चेला खरी सुरुवात ही शाहरुखच्या घरातूनच झाली आहे. शाहरुखच्या थोरल्या बहिणीच्या मते, अबरामपेक्षा शाहरुखच जास्त हँडसम आहे. अबरामचे रुप हुबेहुब शाहरुखच्या बालपणीसारखेच असल्याचे, अनेकांचे म्हणणे आहे. लोकांनी अबरामला क्यूट म्हटले आहे. मात्र शाहरुखची बहीण शहनाजच्या मते, शाहरुखच बालपणी अबरामपेक्षा जास्त हँडसम होता.
अलीकडेच शाहरुखने
आपल्या बालपणीच्या एका छायाचित्रासोबत अबरामचे छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या छायाचित्रासोबत त्याने ट्विट केले, "बहिणी खूप प्रेमळ असतात. मी बालपणी अगदी अबरामसारखाच दिसायचो का? असा प्रश्न मी माझ्या बहिणीला विचारला. तेव्हा तिने नाही असे उत्तर दिले आणि म्हणाली, अबरामपेक्षा तूच जास्त हँडसम होता." या छायाचित्र आणि ट्विटला काही तासांतच हजारो कमेंट्स आल्या आणि अनेकांनी ते रिट्विट केले.
शाहरुखसोबतच राहते त्याची बहीण...
सुपरस्टार शाहरुख मुंबईत मन्नत बंगल्यात वास्तव्याला आहे. त्याची थोरली बहीण शहनाज त्याच्यासोबतच वास्तव्याला आहे. आईवडिलांच्या निधनानंतर शाहरुख आपल्या बहिणीचा सांभाळ करतोय.
पहिल्यांदा कोलकातामध्ये दिसला होता अबराम...
कोलकातामध्ये आयपीएल मॅचवेळी शाहरुखने पहिल्यांदा अबरामला लोकांसमोर आणले होते. संपूर्ण मॅचदरम्यान अबराम आपल्या वडिलांसोबत होता. टीमचा विजय झाल्यानंतर शाहरुखने मैदानावर फेरफटका मारुन लोकांचे धन्यवाद दिले. यावेळी अबराम त्याच्यासोबतच होता.
यापूर्वी शाहरुखने अबरामची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अबरामचा हातात झाडू घेतलेला फोटो व्हायरल झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाहरुखचे ट्विट आणि अबरामची काही निवडक छायाचित्रे...