आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Celebrated 50th Birthday With Wife And Kids

रात्री 12 वाजता पत्नी आणि मुलांसोबत मिळून शाहरुखने कापला B'day केक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि पत्नी गौरीसोबत केक कापताना शाहरुख खान - Divya Marathi
मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि पत्नी गौरीसोबत केक कापताना शाहरुख खान

मुंबईः सुपरस्टार शाहरुख खानने आज वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने गौरी खानने त्याला एक सरप्राईज दिले. घड्याळात बाराचा ठोका पडताच गौरीने शाहरुखला बर्थडे विश केला. इतकेच नाही तर शाहरुखने, पत्नी गौरी, मुले आर्यन, अबराम आणि मुलगी सुहानासोबत केक कापून आपल्या बर्थडेला सुरुवात केली.
गौरी खान फॅन्स क्लबच्या ट्विटर अकाउंटवर या सेलिब्रेशनचे एक छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. फोटोसोबत ट्विट आहे, "The best gift given to us on @iamsrk's birthday by #GauriKhan.." शाहरुख खान सध्या आपल्या आपल्या आगामी सिनेमांच्या शूटिंग आणि प्रमोशन्समध्ये बिझी आहे. दिलवाले हा त्याचा आगामी सिनेमा येत्या 18 डिसेंबर रोजी रिलीज होणारेय, तर 'फॅन' हा सिनेमा पुढील वर्षी 15 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
शाहरुख म्हणाला, हसण्यासाठी मिळाला नवा बहाणा
आज मला हसण्यासाठी नवा बहाणा मिळाला असून चाहत्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद, असे शाहरुख खानने म्हटले आहे. त्याने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना ट्विट केले, "t’s been a few hrs & I hav received such unconditional lov & wishes for my smile, I think it’s time I find new reasons 2 smile from today"
चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट
शाहरुख खानने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना एक रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्याचे हे गिफ्ट म्हणजे फॅनचा टीजर आहे. शाहरुखने सिनेमाचा टीजर शेअर करताना लिहिले, "#IamGaurav and meet me here". आणखी एका ट्विटमध्ये त्याने चाहत्यांना धन्यवाद दिले आहे. त्याने लिहिले, "Right now so humbled by the attention & love being given to my Birthday. Didn’t ever realise living will be so beautiful. Thanks all."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गौरी खान फॅन क्लिब आणि शाहरुख खानचे tweets...