आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचा \'रईस\'ला विरोध नाही; शाहरुखने घेतली राज ठाकरेंची भेट, सलमानने केली मध्यस्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता शाहरुख खान याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांची रविवारी त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. दोन महिन्यांपूर्वी मनसेने पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट देशात चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. शाहरुखचा “रईस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान हिची भूमिका आहे. या चित्रपटाला विरोध करू नये, यासाठी शाहरुख राज यांच्या भेटीला गेला होता.
या वेळी दोघांत काही वेळ चर्चा झाल्याचे मनसेतील सूत्रांनी सांगितले. याआधी मनसेने करण जोहरच्या “ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने ते अडचणीत सापडले होते. दरम्यान, शाहरुखला कुणालाही भेटण्याची गरज नाही. त्याच्या चित्रपटाला कुणी विरोध केला तर आम्ही चित्रपटगृहाला संरक्षण देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

'रईस'मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा...
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने शाहरुखच्या 'रईस' सिनेमात काम केले आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी पाकिस्तानी कलाकारांना भारतात विरोध केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिलिज झालेला करण जोहर याचा सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’ला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या सिनेमात पाकिस्तान अभिनेता फवाद खान याने भूमिका केली होती.

पुढील स्लाईडवर वाचा... 'रईस' गुजरातमधील अवैध दारुचा व्यापारी अब्दुल लतिफच्या जीवनावर आधारित...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...