आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 4 वर्षांचा झाला शाहरुखचा चिमुकला अबराम, सनी लिओनी आहे त्याची फॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बी-टाउनमधील सर्वाधिक चर्चेत राहणा-या स्टार किड्सपैकी एक आहे अभिनेता शाहरुख खानचा चिमुकला मुलगा अबराम. 27 मे 2013 रोजी सरोगसीच्या माध्यमातून जन्मलेल्या अबरामचा आज वाढदिवस असून तो चार वर्षांचा झाला आहे. अबराम हा शाहरुखचा तिसरा मुलगा असून त्याच्या थोरल्या मुलाचे नाव आर्यन आणि मुलीचे नाव सुहाना आहे. अबराम आता लहान असला, तरी त्याची फॅन फॉलोइंग एखाद्या मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. अबराम शाहरुखच्या 'हॅपी न्यू ईयर' या सिनेमात झळकला आहे. 

विमानात साजरा झाला होता तिसरा वाढदिवस...
शाहरुखने अबरामचा तिसरा वाढदिवस गेल्यावर्षी लंडनहून भारतात परतत असताना विमानात साजरा केला होता. शाहरुखने ट्विटरवर याची माहिती देताना लिहिले होते, की भारतात परत असताना 30 हजार फूट उंचावर प्लेनमध्ये अबरामच्या बर्थडेचे सेलिब्रेशन झाले.
 
अबरामला शाहरुखचा नव्हे आर्यनचा मुलगा समजू लागले होते लोक
शाहरुख खानने अलीकडेच एक व्हिडिओ यूट्युबवर शेअर केला. हा व्हिडिओ 28 एप्रिल रोजी व्हँकूवरमध्ये झालेल्या TED 2017 या इव्हेंटमधील आहे. यामध्ये शाहरुखने पहिल्यांदाचा खुलासा केला होता, की लोक अबरामला त्याचा नव्हे तर त्याचा (शाहरुखचा) मुलगा आर्यनचा मुलगा समजू लागले होते. शाहरुख या व्हिडिओत म्हणाला होता, "चार वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी गौरीने तिस-या बाळाचे प्लानिंग केले होते. तेव्हा अशी चर्चा सुरु झाली होती, अबराम आमचा नव्हे तर 15 वर्षीय आर्यनचा लव्ह चाइल्ड आहे." 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, फॅमिलीसोबतचे अबरामचे काही PHOTOS आणि वाचा त्याच्याविषयी बरंच काही...
बातम्या आणखी आहेत...