आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीता नव्हे ही आहे सलमानची पहिली गर्लफ्रेंड, होता-होता राहिले होते दोघांचे लग्न!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क- सलमान खान आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहे. मीडियात आलेल्या बातमीनुसार यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी दोघे लग्न करणार आहेत. तसं पाहता, सलमान खानच्या गर्लफ्रेंड्सविषयी बोलायचे झाल्यास, युलियापूर्वी अनेक जणी त्याच्या आयुष्यात आल्या आहेत. जसीम खानने सलमानची बायोग्राफी 'बीइंग सलमान'मध्ये त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंड आणि त्याच्याशी निगडीत काही किस्से शेअर केले आहेत. हे किस्से कधीच समोर आलेले नव्हते. कोण होती ती, कशी दोघांची भेट झाली, कसे दोघे वेगळे झाले, कुणामुळे हे नाते संपुष्टात आले. जसीमच्या पुस्तकातील काही पानांवर दिलेली ही लव्हस्टोरी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

गतकाळातील सुपरस्टारची नात आहे सलमानची पहिली गर्लफ्रेंड...
- पेशाने मॉडेल असलेली शाहीन जाफरी सलमानचे पहिले प्रेम होते.
- शाहीन हिंदी सिनेसृष्टीच्या ब्लॅक अँड व्हाइट काळातील सुपरस्टार अशोक कुमार यांची नात आहे.
- अशोक कुमार यांची मुलगी भारतीने अभिनेता सईद जाफरीचा भाऊ हामिद जाफरीसोबत दुसरे लग्न केले होते. हामिद-भारती यांना जेनिव (आडवाणी) आणि शाहीन जाफरी या दोन मुली आहेत.
- ही प्रेमकथा सलमान स्टार होण्यापूर्वीच सुरु झाली होती. सलमान त्यावेळी मुंबईच्या सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये व्दितीय वर्षात शिकत होता.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, शाहीनच्या कॉलेज बाहेर तासन्तास उभा राहत होता सलमान...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...