आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOSSIP: मीरासोबत लग्नानंतर सिनेमात इंटीमेट सीन्स करणार नाही शाहिद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मीरा राजपूत आणि शाहिद कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर जुलै महिन्यात मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणारेय. लग्नानंतर म्हणे शाहिद कपूरने सिनेमात इंटीमेट सीन्स न करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्रीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद मीरासोबत लग्नानंतर सिनेमात इंटीमट सीन्स करणे बंद करणार आहे. त्याची भावी पत्नी मीराला त्याचे अभिनेत्रींसोबतचे किसींग आणि इंटीमेट सीन्स बघणे पसंत नाहीये. याच कारणामुळे शाहिदने सिनेमांच्या करारात नो टू किसींग सीन्स हा एक नवीन क्लॉज जोडला आहे.
रिसेप्शनमध्ये गर्लफ्रेंड्सना आमंत्रण
5 ते 8 जुलै याकाळात दिल्लीत शाहिद-मीराचा लग्नसोहळा पार पडणारेय. त्यानंतर 12 जुलै रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली आहे. मीराची इंडस्ट्रीतील लोकांशी ओळख व्हावी, यासाठी ही रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. रिसेप्शनमध्ये शाहिदने त्याच्या एक्सगर्लफ्रेंड्स करीना कपूर खान ('फिदा', 'जब वी मेट', 'चुप चुपके', '36 चाइना टाउन'), विद्या बालन ('किस्मत कनेक्शन'), प्रियांका चोप्रा ('कमीने', 'तेरी मेरी कहानी'), सोनाक्षी सिन्हा ('आर...राजकुमार') यांना आमंत्रित केले आहे. या चारही अभिनेत्रींसोबत एकेकाळी शाहिदचे नाव जुळेल होते. करीना आणि प्रियांकासोबत बरेच दिवस शाहिदचे अफेअर होते. आता या सर्व अभिनेत्रींना भेटल्यानंतर मीराची प्रतिक्रिया काय असणार, याची उत्सुकता आहे.
अनेक अभिनेत्रींसोबत जुळले आहे शाहिदचे नाव
शाहिदचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत जुळले आहे. या लिस्टमध्ये करीना कपूर खान, विद्या बालनपासून ते प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. सैफ अली खानसोबत लग्न होण्यापूर्वी करीनाचे शाहिदसोबतचे अफेअर बरेच गाजले होते. बातम्यांनुसार, करीनाने शाहिदसाठी नॉनव्हेज सोडले होते.
'किस्मत कनेक्शन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहिदचे विद्या बालनसोबत जुळले होते. तर तेरी मेरी कहानी या सिनेमाच्या वेळी प्रियांका चोप्राची शाहिदच्या आयुष्यात एन्ट्री झाली. विद्याने एका मुलाखतीत शाहिदसोबतचे आपले नाते कबुल केले होते. तर एकदा प्रियांकाच्या वर्सोवास्थित घरी इनकम टॅक्स डिपार्टमेंटने सकाळी साडे सातच्या सुमारास धाड टाकली होती. त्यावेळी शाहिद तिच्यासोबत तेथे उपस्थित होता. या घटनेनंतर शाहिद-प्रियांकाचे अफेअर चर्चेत आले होते. करीना, विद्या आणि प्रियांकाशिवाय हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सन्हासोबत शाहिदच्या अफेअरची अफवा मीडियात आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एक्स-गर्लफ्रेंड्ससोबतचे PHOTOS....