आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Kapoor And Mira Rajput In London On A Honeymoon

शाहिदने घेतला 15 दिवसांचा ब्रेक, हनीमूनसाठी लंडनला झाला रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सात जुलैला दिल्लीमध्ये मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकलेल्या शाहिद कपूरने 10 जुलैला वेडिंग रिसेप्शन दिले आणि त्यानंतर लग्न कामास सुरुवात केली. डान्स रिअॅलिटी शोच्या परिक्षकाची भूमिका निभावण्यात आणि आपल्या आगामी 'शानदार' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता.
इतक्या बिझी शेड्यूलमध्ये त्याला हनीमूनला जाण्यास वेळच मिळाला नाही. आता त्याने बिझी शेड्यूलमधून सुट्या घेतल्या आहेत. त्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले, की शाहिद लंडनसाठी रवाना झाला आहे. तिथे तो मिरासोबत क्वालिटी टाइम घालवणार आहे.
या कपलला यूरोपला जायचे होते, मात्र अचानक प्लान बदलला आणि ते लंडनला रवाना झाले. यादरम्यान माहित झाले, की शाहिद आपल्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केल्याने मनीष पॉलवर नाराज आहे. त्यामुळे त्याने शोचा एक एपिसोड स्वत: होस्ट केला. मनीषला त्यात किडनॅप सांगण्यात आले होत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहिद-मीराचे खास फोटो...