एन्टरटेन्मेंट डेस्कः 14 आणि 15 जुलै रोजी न्यूयॉर्क येथे बॉलिवूडचा ऑस्कर समजला जाणारा आयफा अवॉर्ड सोहळा पार पडला. 'उडता पंजाब' या सिनेमातील भूमिकेसाठी शाहिद कपूरला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आयफा पुरस्कार मिळाला. या सोहळ्यात शाहिद पत्नी मीरा राजपूतसोबत सहभागी झाला होता. ऑरेंज कलरच्या लाँग गाऊनमध्ये मीराचा स्टनिंग लूक बघायला मिळाला.
आयफाच्या ग्रीन कार्पेटवर अवतरण्यापूर्वी मीरा या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल दिसली होती. झाले असे, की आयफा अवॉर्डच्या कार्यक्रमस्थळी दाखल झाल्यानंतर कारमधून उतरताना मीरा तिचा हा लाँग गाऊन सांभाळू शकली नाही. गाऊन तिच्या पायात अडखळला. यावेळी शाहिद तिच्या मदतीला धावून आला. शाहिदने पत्नीची अडचण दूर करत तिला गाऊन सांभाळण्यास मदत केली. यावेळी येथे उपस्थित असलेल्या शाहिदच्या काही चाहत्यांनी त्यांची ही छायाचित्रे क्लिक करुन सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. वरील दोन छायाचित्रांमध्ये शाहिद मीराला मदत करताना दिसतोय.
या पॅकेजमध्ये बघा, आयफा सोहळ्यात क्लिक झालेले शाहिद-मीराचे खास Photos....