मुंबई - इश्क-विश्क (2003) चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता शाहिदची तुलना नेहमी शाहरुखबरोबर केली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीलाच असताना शाहरुखसारख्या मोठ्या स्टारबरोबर माझी तुलना केली जात असे. तेव्हा मला कळत नसे की मी ही गोष्ट कशाप्रकारे घेऊ. पण विशाल भारद्वाज यांच्या कमीने चित्रपटाने माझी इमेज बदलण्यास फार मदत केली. मी माझ्या कामात नेहमी एक्सपिरिमेंट करण्यास मागे हटत नाही. काही लोकांना माझे काम आवडते तर काही लोकांना आवडत नाही. शाहिद सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटात शाहिदसोबत रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणही आहे.