आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Kapoor Fiance Mira Rajput Turned Interior Designer

या अपार्टमेंटमध्ये आहे शाहिदचा फ्लॅट, भावी पत्नी मीरा करतेय घराचे इंटेरियर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[प्रणेता अपार्टमेंट (इनसेटमध्ये मीरा राजपूत आणि शाहिद कपूर)]
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने गेल्यावर्षी मुंबईतील जुहू परिसरात एक सी फेसिंग फ्लॅट खरेदी केला. सध्या या फ्लॅटच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. आता बातमी आहे, की शाहिदची भावी पत्नी मीरा राजपूतने घरातील इंटेरियरची जबाबदारी सांभाळली आहे.
शाहिद आणि मीराचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाल्याचे समजते. इतकेच नाही तर यावर्षी डिसेंबर महिन्यात विवाहबद्ध होत असल्याचे शाहिदने अलीकडेच एका मुलाखतीत स्पष्ट केले. मात्र साखरपुडा झाल्याच्या बातमीचा त्याने इंकार केला.
असो, यावर्षी लग्नगाठीत अडकणारे शाहीद आणि मीरा आपल्या फ्लॅटला सजवण्यात बिझी आहेत. डिसेंबरपूर्वी घराचे इंटेरियर पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घराचे इंटेरियर मीराच्या पसंतीचे आहे. वेळोवेळी ती फ्लॅटचे डिझाइन बघण्यासाठी तेथे येत असते. इतकेच नाही तर मीराचे भावी सासरे आणि शाहिदचे वडील पंकज कपूरसुद्धा तिला या कामात मदत करत आहेत. तेदेखील अधूनमधून तेथे जात असतात.
शाहिदचा जुहूस्थित फ्लॅट हा प्रणेता अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरवर आहे. 1000 चौ. फुटात हा फ्लॅट आहे. या अपार्टमेंटसमोर बीच आहे. अभिनेत्री विद्या बालनचाही फ्लॅट याच अपार्टमेंटमध्ये आहे. 14 कोटींचा हा फ्लॅट विद्याला तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी भेट म्हणून दिला आहे.
पुढे पाहा, शाहिदच्या अपार्टमेंटची खास छायाचित्रे.. .