आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनवरुन लग्नाचे निमंत्रण देतोय शाहिद कपूर, सावत्र वडिलांनाही बोलावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सावत्र वडील राजेश खट्टरसोबत अभिनेता शाहिद कपूर)
एन्टरटेन्मेंट डेस्कः पुढील महिन्यात अभिनेता शाहिद कपूर लग्नगाठीत अडकणार आहे. या लग्नाची गेस्टलिस्ट तयार झाली असून लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यापूर्वी शाहिद स्वतः फोनवरुन पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण देतोय. शाहिदच्या पाहुण्यांच्या यादीत त्याचे सावत्र वडील राजेश ठक्कर आणि त्यांच्या दुस-या पत्नी वंदना सज्जानी यांच्या नावाचाही समावेश आहे.
शाहिदची आई नीलिमा अजीम यांनी पंकज कपूर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर राजेश ठक्करसोबत लग्न केले होते. दुस-या लग्नापासून त्यांना ईशान ठक्कर हा मुलगा झाला. ईशान सात वर्षांचा असताना राजेश यांच्या आयुष्यात वंदनाची एन्ट्री झाली.
वंदना यांनी सांगितले, "या लग्नात अगदी सुरुवातीपासून राजेश सहभागी आहेत. ते सतत शाहिदच्या संपर्कात आहे. आमच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा दिवस असून आम्ही सर्वजण या लग्नात सहभागी होणार आहोत." तर राजेश यांनी सांगितले, "शाहिदने वेन्यूपासून ते मेन्यूपर्यंतची सर्व कामे संबंधित लोकांना दिली आहेत. शाहिद स्वतः प्रत्येक पाहुण्याला फोनवरुन निमंत्रित करतोय."
1990 मध्ये शाहिदच्या आईचे झाले होते राजेश खट्टरसोबत लग्न...
शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम यांनी 1984 मध्ये पंकज कपूर यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर 1990 मध्ये त्यांनी राजेश खट्टरसोबत लग्न केले. 2001 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2004मध्ये रजा अली खान यांच्यासोबत नीलिमा यांनी तिसरे लग्न केले. मात्र पाच वर्षांतच त्यांचे नाते तुटले आणि 2009 मध्ये दोघे कायदेशिररित्या विभक्त झाले. शाहिद, पंकज कपूर यांचा मुलगा तर ईशान, राजेश खट्टर यांचा मुलगा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहिदची आईवडील आणि भावासोबतची निवडक छायाचित्रे...